देशातील अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. अनेक लोक निष्काळजीपणामुळे आपला जीव धोक्यात घालतात आणि दुर्देवाने जीव गमावतात देखील. तर अनेक अपघात असे असतात की, त्या अपघातांमध्ये अगदी क्षुल्लक कारणामुळे लोकांनी जीव गमावलेला असतो. अलीकडच्या काळात तर योग्य ती काळजी न घेतल्यामुळे अपघातांना बळी पडल्याच्या अनेक बातम्या आपण वाचल्या आहेत.

मात्र, कधी कधी निष्काळजीपणा करणाऱ्यांना सुदैवाने मोठ्या अपघातांमध्ये जीवदान मिळाल्याचे व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहत असतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील व्यक्ती बुटासाठी आपला जीव धोक्यात घालतो पण त्याला एक जवान जीवदान देत आहे.

आणखी पाहा- बापरे! झोपेलेल्या महिलेच्या तोंडात शिरला भलामोठा साप; अंगावर शहारे आणणारा Viral Video पाहिलात का?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रेल्वे पकडण्यासाठी फलाटावर जाण्यासाठी असणाऱ्या पुलाचा वापर न करता रेल्वे रुळावरुनच फलाटावर जाण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. याचदरम्यान, त्याच्या पायातील बूट घसरतो. घसरलेला बुट उचलण्यासाठी तो मागे वळतो तेवढ्यामध्ये त्या रुळावर रेल्वे येते.

त्यामुळे तो चांगलाच घाबरतो आणि जोरात त्या रुळावरुन निसटण्याचा प्रयत्न करतो, सुदैवाने फलाटावर उपस्थित असणारा एक आरपीएफचा जवान त्या व्यक्तीला जोरात खेचतो आणि सुखरुप वाचवतो देखील, पण केवळ बुटासाठी आपला जीव असा धोक्यात घालणं कितपत योग्य आहे असा संतप्त सवाल नेटकरी विचारत आहेत.

शिवाय या व्यक्तीच्या कृत्याचा अनेकांना राग आला आहे आणि म्हणूनच की काय, त्याला मृत्यूच्या दाढेतून वाचवणाऱ्या आरपीएच्या जवानानेच त्या व्यक्तीच्या कानशिलात लगावल्याचं देखील व्हिडीओमध्ये दिसतं आहे. दरम्यान, व्हायरल झालेला हा व्हिडिओ ‘जिंदगी गुलजार है’ नावाच्या ट्विटर अकाउंटवर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ शेअर करताना “आपल्या जीवाची किंमत ही पायातील बुटांपेक्षा जास्त आहे, बुट पुन्हा मिळतील. मात्र, जीवण पुन्हा मिळणार नाही ” असं कॅप्शन त्यांनी ट्विटला दिलं आहे. त्यामुळे नागरिकांनी क्षुल्लक कारणांसाठी आपला बहुमुल्य जीव धोक्यात घालू नये असं आवाहन देखील रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.