Dance video viral: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, कधी रस्त्यांवर फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी लोकं अशाप्रकारचे व्हिडीओ करत असतात.

आजकाल अनेक मराठी गाण्यांचा ट्रेंड सोशल मीडियावर चालतोय. गुलाबी साडी, नऊवारी साडी, झापुकझुपूक अशी अनेक गाणी ट्रेंडिंग झाल्यावर अनेक रील्स स्टार आणि इन्फ्लूएंसर्सने यावर व्हिडीओ बनवत डान्स केला होता. या सगळ्या गाण्यांनंतर सध्या ‘तांबडी चांबडी’ हे गाणं खूप व्हायरल होतंय. या गाण्यावरदेखील अनेकांनी मजेशीर व्हिडीओ शेअर केले आहेत. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक माणूस परदेशात या गाण्यावर डान्स करतोय. पण, हा डान्स तो रस्त्यावर झोपून करतोय.

हेही वाचा… शेवटी ती ही माणसंच! कारचालकाने डिलिव्हरी बॉयचं पार्सल रस्त्यावर फेकलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं?

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. “तांबडी चांबडी” या प्रसिद्ध गाण्यावर एका तरुणाने परदेशातील रस्त्यावर डान्स केला आहे. यातील त्याच्या डान्सची स्टेप व्हायरल होतेय, जी खूप वेगळी आहे. रस्त्यावर अगदी झोपून तो या गाण्यावर डान्स करतोय. त्याच्या आजूबाजूला गर्दी जमली आहे आणि या डान्समुळे त्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

हा व्हि़डीओ @kakde_property_mh20 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून ‘आपलं मराठी गाणं बाहेर देशात फेमस’ असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओला पाच लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… सगळ्या मुली सारख्या नसतात! कठीण काळातही तरुणीने सोडली नाही साथ, कपलचा ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “गाणं सोडा, तो डान्स शिकवा आधी.” तर दुसऱ्याने अशी कमेंट केली. एक जण कमेंट करत म्हणाला, “मराठी गाणं वाजलंच पाहिजे”, तर तिसऱ्याने “याला चक्कर आली का, कोणीतरी याला बघा”, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.