सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी अनोखे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ आपल्याला अगदी मजेशीर वाटतात, तर काही व्हिडीओ आपल्याला थक्क करतात. असे व्हिडीओ आपल्या कायमचे लक्षात राहतात. या डिजिटल युगात एखादी बाब व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही.

आजकाल कधी कोणावर वाईट प्रसंग येईल हे सांगता येत नाही. काही जण या प्रसंगातून वेळच्या वेळी सावरतात आणि आपला जीव वाचवतात, तर काही जण घाबरून जाऊन कायमचे आपला जीव गमावतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक महिला एस्केलेटरवर असताना तिला चक्कर येते आणि ती खालीच कोसळते असं म्हटलं जातंय. तिच्याबरोबर नेमकं काय घडतं ते जाणून घेऊ या.

हेही वाचा… आयुष्यापेक्षा झोप महत्त्वाची! गाढ झोपले होते अन् घोरपड घरात घुसली, पुढे जे झालं ते पाहून काळजाचा ठोका चुकेल, पाहा VIDEO

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेला हा व्हिडीओ अनेकांना गोंधळात टाकतोय. या व्हिडीओमध्ये एक महिला सरकत्या जिन्यावर (एस्केलेटर) चढली आणि अचानक तिला चक्कर आल्याने ती खालीच कोसळली. एस्केलेटर सुरू असल्याने महिला खाली येण्याच्या प्रयत्नात पुन्हा पुन्हा वरच जात होती. खाली कोसळल्यानंतर उठण्याचा प्रयत्न करत असलेल्या या महिलेला नीट उभंही राहता येत नसल्याने ती वारंवर गटांगळ्या खात खाली कोसळत असते. तिला असं पाहून दोघं जण तिच्या मदतीला आले. तिला चक्कर आल्याचं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहलंय, पण नेमकी तिला चक्कर आली की हे तिने स्वत:हून केलं हे कळू शकलं नाही.

हा व्हायरल व्हिडीओ @globalkeras या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला ३.८ मिलियन व्ह्यूज आले आहेत. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकलेले नाही. तसंच या महिलेबरोबर पुढे नक्की काय घडलं हेदेखील कळू शकलं नाही.

हेही वाचा… VIDEO: प्रेम काहीही करायला लावतं! बायको छतावरून कोसळली म्हणून नवऱ्याने मारली उडी, पाहा नेमकं काय घडलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत विचारलं की, “ती नक्की काय करायचा प्रयत्न करतेय?” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “या क्षणी ती फक्त मजा करत आहे”, अशी कमेंट केली. तर तिसऱ्याने “हे एस्केलेटर आहे वॉशिंग मशीन नाही” अशी कमेंट केली. तर अनेकांनी “ही पागल झाली काय?” अशीदेखील कमेंट केली.