Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हयरल होतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ तर अंगावर काटा आणणारे असतात. अपघाताचे व्हिडीओ इतके भयानक असतात की पाहून थरकाप उडतो. व्हायरल झालेल्या अपघाताच्या व्हिडीओमध्ये अनेकदा दिसून येते की एका लहानशा चुकीमुळे लोक अनेकदा जीव गमवतात. काही लोक रिस्क घेत जीवाशी खेळतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रिक्षाचालकाच्या घाईने असं काही घडतं की पाहून तुम्हालाही संताप येईल.

रिक्षाचालकाला एवढी घाई करायची काय गरज? एक चूक अन्..

हा व्हायरल व्हिडीओ एका रस्त्यावरील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक कार रस्त्याने जात आहे. अचानक या कारच्या समोरून ट्रक येतो आणि रस्ता क्रॉस करताना दिसतो, तेव्हा कार स्पीड कमी करते आणि एका ठिकाणी थांबते आणि ट्रक चालकाला रस्ता क्रॉस करू देते पण कारच्या शेजारी असलेला ऑटोचालक मात्र घाई करतो. प्रवाशांनी भरलेला हा ऑटो कार आणि ट्रकच्या मधून जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातील एक प्रवासी खाली पडतो. ऑटोतील इतर प्रवाशांबरोबर काय घडते, हे या व्हिडीओमध्ये दिसत नाही. पण ऑटोचालकाच्या घाईमुळे मोठा अपघात घडला असता, सुदैवाने थोडक्यात सर्व प्रवासी वाचले. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “रिक्षावाल्याला काही गरज नाही गडबड करायची तुम्ही बघा!”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

yogi90949 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शूट करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “काय गरज घाई करायची”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पांढरा पट्टा सोडून पलीकडे काढली रिक्षा आपली लाईन सोडायची गरज काय?” तर एका युजरने लिहिलेय, “रिक्षावाल्याला खूप घाई असते…” आणखी एका युजरने लिहिलेय, “इथे बहुतेक लोक असेच गाडी चालवतात….कधी बाईकस्वार, कधी कार, कधी टेम्पो, कधी स्कूटी, कधी बस, कधी ट्रक…कोण चालवत आहे आणि त्याच्या मानसिकतेवरती अवलंबून असते.” अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे.