scorecardresearch

VIRAL VIDEO : एकत्र बसून खोलीत आराम करत होते, तेवढ्यात कोसळला छताचा पंखा

हा व्हिडीओ पाहून काही क्षणांसाठी तुमचा श्वास थांबू शकतो. यामध्ये कुटूंबातील सर्वजण एकत्र बसून आराम करत असल्याचं दिसत आहे आणि अचानक अशी घटना घडते ती पाहून तुम्ही थक्क व्हाल.

Fan-Fell-Down-Video-Viral
(Photo: Instagram/ ghantaa)

घरात आल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य दिवसभर बाहेर काम करून थकून घरी येतात, घरी जेवण करून विसावा घेतात. मात्र घरात विसावा घेत असलेल्या एका कुटूंबाचा असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून काही क्षणांसाठी तुमचा श्वास थांबू शकतो. हा व्हिडीओ कुठचा आहे हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. यामध्ये कुटूंबातील सर्वजण एकत्र बसून आराम करत असल्याचं दिसत आहे आणि अचानक अशी घटना घडते ती पाहून तुम्ही थक्क व्हाल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका छोट्या खोलीत सुमारे ३ लोक आराम करताना दिसत आहेत. सर्वजण शांत झोपले होते. पण पुढे जाऊन एक मोठी घटना घडणार आहे, याची त्यांना पुसटशी कल्पना देखील नव्हती. घरात सगळेच जण आराम करत एकमेकांसोबत गप्पा मारण्यात रंगले होते. व्हिडीओ पाहून सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटते. मात्र नंतर अचानक त्याच्यावर छताचा पंखा कोसळतो. हा पंखा या तिघांपैकी एकाच्या अगदी जवळ जाऊन पडतो. हा पंखा थोडा या व्यक्तीच्या जवळून पडला असता तर कदाचित या माणसाच्या जीवाला धोका पोहचू शकला असता. पण या व्यक्तीचं नशीब बलवत्तर होतं म्हणून पंखा या व्यक्तीच्या काही अंतर पुढे जाऊन कोसळला.

आणखी वाचा : स्वतःचा व्हिडीओ बघताच माकडांची मजेशीर रिअ‍ॅक्शन; VIRAL VIDEO पाहून खळखळून हसाल

सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. पण पंखा पडल्यानंतर गप्पा मारण्यात दंग असलेले हे तिघेही काही वेळासाठी सुन्न होऊन जातात. सर्वजण गोंधळून एकमेकांकडे पाहू लागतात. मात्र हे तिघेही थोडक्यात बचावले आहेत. जर हा सिलिंग फॅन झोपलेल्या लोकांच्या अंगावर पडला असता तर नक्कीच मोठी घटना घडू शकली असती. पण चांगली गोष्ट म्हणजे पंखा दोघांच्या मधोमध पडला.

आणखी वाचा : मुंबईच्या लोकल ट्रेनमधली ‘पुष्पा’ स्टाईल तुम्ही पाहिलीय का? श्रीवल्ली हुक स्टेपचा रिक्रिएट VIRAL VIDEO एकदा पाहाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : “तू दारू का पितो?” असा प्रश्न केल्यानंतर या व्यक्तीने जे उत्तर दिलं ते ऐकून तुम्ही पोट धरून हसाल!

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ghantaa नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला असून तो पाहताच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एक लाख ६२ हजारांहून अधिक वेळा पाहिला आणि लाईक करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, ‘आता मला झोप कशी येईल.’ इतर युजर्स देखील आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video of fan falling in room when people rest see what happened prp

ताज्या बातम्या