जर तुम्हाला विचारले की, तुमच्या बालपणीच्या सर्वोत्तम आठवण सांगा…..तर त्यामध्ये तुमच्या आजी-आजोबांबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण तुम्हाला नक्कीच आठवेल. हो ना! आजी-आजोबा हे नातवंडाचे सर्वात चांगले मित्र असतात. आपण चुकलो तरी ते नेहमी प्रेमाने समजावतात, आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतात, आई-बाबांचा ओरडा किंवा मार दोन्हीपासून वाचवतात, आपल्याला खाऊ देतात, आपल्याबरोबर खेळतात, आपले भरपूर लाड करतात. आजी-आजोबांबरोबर आपल्या असंख्य सुंदर आठवणी असतात. आजी आजोबांसारखे प्रेम आपल्यावर जगात कोणीही करू शकत नाही.
आजीआजोंबांच्या सहवासात जेव्हा मुलांचे बालपण जाते तेव्हा तो काळ त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ असतो. बालपणीच्या अशा असंख्य आठवणींना उजाळा देणारा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा आजोबा आणि नातीचा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी नक्कीच येईल.
आजोबा नातीचा गोंडस डान्स व्हिडीओ व्हायरल
‘theruhafamily’ नावाने एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने पोस्ट केलेल्या या क्लिपमध्ये एक गोंडस मुलगी दिसते. तिच्याच्याबरोबर थकलेले आजोबा नाचताना दिसत आहे. ते आजोबा इतके थकलेले दिसत आहे ते की, ते फार वेळ उभे राहू शकणार नाही असे वाटते तरीही लाडक्या नातीबरोबर उत्साहात नाचताना दिसत आहे. नातीबरोबर नाचताना ते खूप आनंदी दिसत आहेत.
नाचताना जेव्हा आजोबा थकतात तेव्हा ते बेडवर बसतात. त्यानंतर चिमुकलीने आजोबांच्या पायांना मालिश करायला सुरुवात केली. हे पाहून आजोबा तिच्याकडे कौतुकाने आणि प्रेमाने पाहत आहे. शेवटी त्या चिमुकलीने आजोबांना एक फ्लायिंग किस दिले आणि तिलाही आजोबांनी एक फ्लायिंग किस दिले. या व्हिडीओने अनेकांचे मन जिंकून घेतले आहे.
व्हायरल व्हिडिओ येथे पाहा
/व्हायरल व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. व्हिडिओवर कमेंट करत एकाने लिहिले की, हे प्रेम अमर आहे. मला माझ्या आजोबांची आठवण आली.
आणखी एकाने लिहिले, आजी आजोबांकडे नेहमी नातवडांसाठी वेळ असते आणि मोकळ्या मनाने ते आपल्याशी संवाद साधतात. आजी आजोबा असणे भाग्याची गोष्ट आहे.
तिसऱ्याने कमेंट केली की, “आजोबा आणि नात दोघेही खूप गोंडस आहेत.”