Mumbai Local Viral Video: मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ठिकठिकाणाहून लोक मुंबईत येतात आणि मुंबईचेच होऊन जातात. या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी लोकलमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. दररोज सकाळी कामावर जाणाऱ्यांची लगबग आणि धक्काबुक्की करत ‘अंदर बहुत जगा है’ असं म्हणत मुंबई लोकलमध्ये दर दिवशी असंख्य माणसांची गर्दी पाहायला मिळते.
दररोजच्या या लोकल प्रवासाची अनेकांना सवय झालेली असते. नोकरीसाठी अनेक लोक अगदी आपल्या जीवाची पर्वा न करता लोकलमधून प्रवास करतात. सध्या मुंबई लोकलचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात भरगच्च लोकलमधून प्रवासी प्रवास करतायत. तर काहींना गर्दीमुळे आत शिरायलाही जागा दिसत नाहीय.
व्हायरल व्हिडीओ (Mumbai Life Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये भरगच्च ट्रेनमध्ये अनेक लोक दरवाज्याला लटकूनच प्रवास करताना दिसतायत. चालती ट्रेन पकडायची म्हणून एक माणूस ती ट्रेन पकडायला जातो आणि गर्दी असल्यामुळे त्याला चढता येत नाही आणि तो प्लॅटफॉर्मवरच पडतो.
या व्हिडीओवरून मुंबईच्या नोकरदार वर्गाची परिस्थिती दिसून येते. ट्रेनच्या प्रवासात धक्के खात पैसे कमवण्यासाठी धडपडणाऱ्या माणसांचं आयुष्य यातून कळतंय.
लोकलमध्ये प्रवाशांची अफाट गर्दी असूनही नोकरदार वर्ग कामाला जाण्यासाठी याच गर्दीतून दररोज प्रवास करतो. मग अशात जीवाची पर्वा न करता काहीजण ट्रेनच्या दरवाजाला लटकून प्रवास करतात. ट्रेनला लटकल्यामुळे अपघात झाल्याच आपण अनेकदा ऐकतही असतो पण जीव मुठीत घेऊन कित्येक लोक या लोकलने प्रवास करतात.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @mumbai.moodboard या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला ९ हजारापेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत. तसेच ‘बाळा सगळं ठीक आहे ना मुंबईत’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी या व्हिडीओवर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले, “इतकं पण खरं बोलायचं नव्हतं” दुसऱ्याने, “मजबुरीचा खेळ आहे, बाकी काही नाही”, अशी कमेंट केली.