Viral Video : लाईटहाऊस जर्नालिजमला एक्सवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला गेलेला व्हिडीओ सापडला, त्या व्हिडीओमध्ये युरोपियन देशातून हत्यारांनी भरलेलं एक जहाज इस्रायलला जात होते. या जहाजाचा फिलिस्तीनच्या (पॅलेस्टाईन) विरोधात उपयोग केला जाणार आहे. मात्र, हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आमच्या तपासातून समोर आले आहे. तर हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे आपण बातमीतून सविस्तर जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर @MR_COOL77777 ने त्याच्या अकाउंटवरून दिशाभूल करणारा व्हिडीओ शेअर (Viral Video) केला आहे. तसेच “एका युरोपियन देशातून हत्यारांनी भरलेले एक मोठे जहाज इस्रायलला जात होते आणि ही शस्त्रे (हत्यारे) निष्पाप पॅलेस्टाईनविरोधात वापरणार होते. पण, कालांतराने येमेनने हे जहाज लाल समुद्रातच नष्ट केले” अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.

इतर युजर्सदेखील समान दाव्यांसह हा व्हिडीओ शेअर (Viral Video) करीत आहेत

https://www.facebook.com/shadab.ahmad.14/videos/1233726561166223

तपास :

आम्ही व्हिडीओवरून कीफ्रेम मिळवून तपास सुरू केला. त्यानंतर आम्ही त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला. तेव्हा आम्हाला अनेक बातम्या दिसल्या.

https://www.etvbharat.com/english/international/asia-pacific/cargo-vessel-in-process-of-sinking-efforts-on-to-clean-up-coast-sri-lankan-officials/na20210527180034452

हेही वाचा…चिमुकलीला पाहून पक्षी झाला खूश; एकमेकांची करू लागले नक्कल अन् … पाहा खेळकर पक्ष्याचा VIRAL VIDEO

ईटीव्ही भारतवरील अहवालात म्हटले आहे की, श्रीलंकेच्या सर्वोच्च पर्यावरण संस्थेने गुरुवारी सांगितले की, कोलंबो समुद्रकिनाऱ्याजवळ गेल्या आठवड्यात आग लागलेले सिंगापूरचा ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडण्याच्या स्थितीत आहे आणि परिणामी तेलगळतीचा सामना करण्यासाठी तयारी सुरू आहे.

तेलगळतीचा सामना करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलानेही जहाजे पाठवली होती. जहाजाच्या टाक्यांमध्ये सुमारे ३२५ मेट्रिक टन इंधन होते.

https://www.india.com/news/india/indian-coast-guard-sends-1-more-ship-if-there-is-oil-spill-from-merchant-vessel-off-colombo-coast- ४६९६२३७/

आम्हाला याबद्दलचा एक व्हिडीओदेखील (Viral Video) सापडला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष : २०२१ मधील श्रीलंकेतील कोलंबो समुद्रकिनाऱ्याजवळ सिंगापूरच्या मालवाहू जहाजाला लागलेल्या आगीचा व्हिडीओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह शेअर केला जात आहे. ‘हे हत्यारांनी भरलेले इस्रायली जहाज असून, ते पॅलेस्टाईनच्या विरोधात वापरण्यात येणार होते’, असा दावा करण्यात आला होता; मात्र हा व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.