Viral Video Shows Bird Was Happy To See The Little One : जंगलातील प्राण्यांना व निरनिराळ्या पक्ष्यांना बघायला आपण सगळेच प्राणिसंग्रहालयात जातो. नॅशनल पार्क, राणीच्या बागेत या खास जंगलातील प्राण्यांसाठी राहण्याची वेगवेगळी सोय करण्यात आलेली असते आणि त्यांना बघण्यासाठी मधे एक पारदर्शक काच असते. आपण प्राणिसंग्रहालयात गेल्यावर त्यांचे फोटो, व्हिडीओ काढतो आणि काही प्राणी, पक्षी हे पाहून आपल्याला वेगवेगळ्या गमतीशीर कृतीदेखील करून दाखवतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक पक्षी व चिमुकली एकमेकांची नक्कल करताना दिसले आहेत.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) परदेशातील आहे. आपल्या कुटुंबाबरोबर प्राणिसंग्रहालयात एक चिमुकली गेलेली दिसते आहे. एका काचेच्या बंद रूममध्ये एक पक्षी उभा असतो. चिमुकली त्या रूमजवळ जाऊन उभी राहते. पक्ष्याला असणारे पंख पाहून, तो दोन्ही हात लांब करून उड्या मारतो आणि नक्कल करू लागतो. चिमुकलीला असे करताना पाहून पक्षी त्याच्याकडे एकटक पाहतो, परत मागे येतो आणि हुबेहूब चिमुकल्याची नक्कल करण्यास सुरुवात करतो. पक्ष्याने चिमुकलीचे केलेली नक्कल व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा…‘हे माझं स्वप्न होतं…’ लेकीनं दिवाळीनिमित्त दिलं खास, महागडं गिफ्ट; VIDEO तून पाहा बाबांची पहिली रिअ‍ॅक्शन

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (viral Video) तुम्ही पाहिले असेल की, चिमुकली पक्ष्यासारखे उडण्याची नक्कल करीत असते. चिमुकली उड्या मारत थोडी पुढे जाते, तर पक्षीसुद्धा तसेच हुबेहूब करू लागतो आणि दोघांमध्ये हा मजेशीर खेळ सुरू होतो. दोघेही एकमेकांबरोबर बराच वेळ हा खेळ खेळत असतात आणि या पक्ष्याचे खेळकर रूप पाहायला मिळते. पक्षी आपली नक्कल करतो आहे हे पाहून चिमुकलीसुद्धा खूश होते. तसेच चिमुकली आणि पक्षी यांच्यातील या गोंडस क्षणाचा व्हिडीओ एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलमध्ये शूट करून घेतलेला असतो.

माझा दिवस आणखीन खास केला

सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Viral Video) _rajni.soni या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘या सुंदर व्हिडीओने माझा दिवस आणखीन खास केला’, अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे. प्राणिसंग्रहालयात अनेक जण फक्त वाघ, सिंह, अस्वल अशा मोठमोठ्या प्राण्यांना बघण्यास उत्सुक असतात. पण, ही चिमुकली या पक्ष्याला बघण्यास उत्सुक होती आणि त्यांच्यबरोबर मनोसोक्त खेळताना दिसली आणि सोशल मीडियावर या व्हिडीओला प्रचंड लाइक्स मिळाले आहेत.

Story img Loader