Viral video: गेल्या काही वर्षांत आत्महत्यांचं प्रमाण वाढत चालल्याचं दिसून येतंय. मानसिक तणावातून अनेक लोक आता आत्महत्येचा पर्याय निवडू लागले आहेत. काही लोकांना स्वत:चंच आयुष्य जड झाल्यासारखं वाटू लागलं आहे. आयुष्यात होणाऱ्या त्रासाला कंटाळून लोक टोकाचा निर्णय घेऊन स्वत:ला संपवतायत. अशात आत्महत्येबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील व्हायरल होत असतात. असे व्हिडीओ पाहून काळजाचा ठोकाच चुकतो.

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एका माणसाने स्वत:चाच जीव धोक्यात घातलाय; नेमकं काय घडलंय, जाणून घेऊ या…

अशी वेळ कोणाच्याच नशिबी येऊ नये…

सध्या इंटरनेटवर चर्चेत असणारा हा व्हिडीओ खूप धक्कादायक आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक माणूस विजेच्या खांबावर चढला आहे. तसंच विजेच्या खांबाच्या खाली आधीच थोड्या प्रमाणात आगीने पेट घेतल्याचं दिसून येतंय.

माणूस विजेच्या खांबावर चढताच क्षणी आधी लागलेल्या आगीमुळे विजेच्या खांबाजवळ स्पार्क होतो आणि एक आगीचा भडका उडतो. त्याच भडक्यात माणूस जळून खाक होतो. त्याने आत्महत्या केल्याची चर्चा सध्या इंटरनेटवर सुरू आहे. यादरम्यान ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @rarani6559 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला “थोडा तरी आई-बाबाचा विचार करत जावा, मग जीव देत जा” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.१ मिलियन व्ह्युज आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “घरची जबाबदारी माणसाला या पायरीपर्यंत घेऊन जाते”, तर दुसऱ्याने “मान्य आहे आयुष्यात अडचणी खूप असतात, पण आपल्या कुटुंबासाठी आपण जगलं पाहिजे” अशी कमेंट केली; तर एकाने कमेंट करत लिहिलं, “कोणाचा त्रास कोणी समजू शकत नाही, फक्त सल्ला द्यायला माणसं येतात, मदत करता येत नसेल तर किमान एखाद्याची बदनामी तरी नका करत जाऊ.”