Viral video: मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सर्वसामान्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. आतापर्यंत तुम्ही मुंबई लोकलमधील भांडणाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. लोकलमधली भांडण काही नवी नाही. ट्रेन नेहमी प्रवाशांनी खचाखच भरलेली असते. गर्दीमुळे चाकरमानी अक्षरश:लोकल ट्रेनच्या दारातही उभे राहूनही चाकरमानी प्रवास करतात. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा उभे राहूनच प्रवास करावा लागतो. आजवर ज्यांनी लोकलने प्रवास केलाय त्यांच्यासाठी ट्रेनमधील भांडणं हा काही नवीन विषय नाही. मात्र सध्या लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, मात्र त्या व्हिडिओत एका काकांनी ट्रेनमध्ये जागा न मिळाल्याने भन्नाट जुगाड शोधून काढला आहे. हा व्हिडओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

एक प्रवासी ट्रेनमध्ये पोहोचला मात्र त्याला जागा मिळाली नाही, पण त्याने असा जुगाड केला की, जे पाहून सुरुवातीला तुम्हीही म्हणाल, हा माणूस खरोखरच कल्पक निघाला.प्रवाशांनी खचाखच भरलेली ट्रेन दिसून येत आहे. प्रवाशांसाठी बसण्यासाठी असलेल्या सर्व सीटवर प्रवाशी बसलेले आहे. मात्र याच लोकल ट्रेनच्या गर्दी एक पुरुष प्रवाशी आपली बॅग ऑपन करतो आणि त्यामधून बसण्यासाठी एक प्लास्टिकचा स्टुल काढतो आणि प्रवाशांनी खचाखच भरलेल्या ट्रेन तो स्टूल ठेवतो आणि बसण्यासाठी जागा करतो. आता तुम्ही म्हणाल एवढ्याश्या बॅगेत स्टूल कसा बसला पण हा स्टूल फोल्डेबल असल्यानं बॅगेत सहज बसला.

actor Nitin Chauhaan dies at 35
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन, ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Ashish Shelar Raj Thackeray
Ashish Shelar : अमित ठाकरेंनंतर भाजपाचा मनसेच्या आणखी एका उमेदवाराला पाठिंबा, कंबर कसून प्रचार करण्याचे आदेश
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
Shocking video of CRPF Jawan Catches Wife Trying To Elope, Thrashes Her Lover In Front Of Crowd At Patna Station
झालं का फिरुन? सीआरपीएफ जवानाने बायकोला बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं; VIDEO पाहून बसेल धक्का

हा स्टूल तुम्ही कुठेही सहज घेऊन जाऊ शकता आणि याचा वापर करु शकता. अशाप्रकारे गर्दीत आता सीट मिळण्याचं टेंशन कायमचं गेलं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “कुणाच्याच संयमाचा अंत पाहू नका” पाकिस्तानी तरुणानं रीलसाठी वाघाच्या जबड्यात घातला हात अन्…थरारक VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ borivali_churchgate_bhajan नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंवरुन शेअर करण्यात आला असून नेटकरी व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून अनेकांनी काकांचं कौतुक केले आहे. एकानं म्हंटलंय की, “आता लोकलमध्ये भांडणंच होणार नाही.” तर आणखी एकानं “प्रत्येकानं असाच जुगाड केला पाहिजे.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader