Viral video: मुंबई लोकलमधून रोज लाखो मुंबईकर प्रवास करत असतात. गर्दीत प्रवास करत घर ते ऑफिस अन् ऑफिस ते घर गाठत असतात. सध्याच्या काळात मुंबईकरांना प्रवासासाठी लोकलचा वापर करणं अत्यंत सुलभ आणि सोपं मानलं जातं. शहराच्या कोणत्याही भागात जाण्यासाठी मुंबईकर प्राधान्याने लोकल रेल्वेचा वापर करतात. परंतु, रेल्वेतून प्रवास करत असताना अनेक लोक डान्स, कला, रील्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ शूट करणं पसंत करत असतात. सोशल मीडियावर असे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये तृतीयपंथीनं लोकलमध्ये भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही त्यांच्यासारखं गाण्यावर थिरकायला लागाल.
आपल्या देशात आजही तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला नाहीये. त्यांना स्वत:चे हक्क मिळवण्यासाठी आणि अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सतत लढा द्यावा लागतो. समाजाकडून सतत मिळणारी अवहेलना आणि आपल्या वाट्याला आलेलं अपयश हे पाहता आता तृतीयपंथीय आपला हक्क मिळवण्यासाठी जास्तच आक्रमक झाले आहेत. मात्र सोशल मीडियामुळे त्यांनाही आता एक हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. अशाच एका तृतीयपंथीनं मुंबई लोकलमध्ये मराठी गाण्यावर भन्नाट डान्स केलाय. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओ पाहून तुम्हीही कौतुक कराल.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, तुम्हाला मुंबई एसी लोकल दिलून येत आहे. ट्रेनमध्ये प्रवाशीची मोठी गर्दी आहे. ज्यात लहान मुलांपासून प्रत्येक वयोगटातील व्यक्तीचा समावेश आहे. तेवढ्यात या लोकलच्या डब्ब्याक मराठी गाणं वाजण्यास सुरुवात होते. ज्यावर सर्वांसमोर एक तृतीयपंथी महिला डान्स करण्यासाठी येते. पारंपरिक साडी नेसलेली असून, गळ्यात विविध माळा परिधान करुन या डान्स करत असतात. या ठिकाणी लोकल रिकामी असल्यानं त्यांना मोकळी जागा मिळाली आणि याचा या तरुणींनी पुरेपूर उपयोग करून घेतला.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ arpanajuvekarmehta नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी या डान्सचं कौतुक करत व्हिडीओ शेअर करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय धावत्या रेल्वेत सर्वांसमोर डान्स करायला धाडस लागतं, असं म्हणत अनेकांनी डान्सला दाद दिली आहे.