Husband Cheating Wife Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका घटनेत, झारखंडच्या गढवा जिल्ह्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याच्या पत्नीने दुसऱ्या महिलेसोबत घरात रंगेहाथ पकडलं.

पत्नी, ज्यांचं नाव डॉ. श्यामा राणी आहे, त्यांनी आपल्या नवऱ्याला आणि त्याच्या प्रेयसीला घरात बंद केलं. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अधिकारी घराच्या आतून पत्नीला दार उघडण्याची विनंती करताना दिसतोय.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

FPJच्या वृत्तानुसार, संबंधित अधिकारी म्हणजे मझियावान सर्कल ऑफिसर (सीओ) प्रमोद कुमार आहेत. ही धक्कादायक घटना शनिवारी (१ नोव्हेंबर) पहाटे साडेचार वाजता घडली. डॉ. श्यामा राणी, ज्या बिहारचे माजी खासदार रामजी मांझी यांच्या मुलगी आहेत, त्या काही दिवसांपासून आपल्या नवऱ्यावर परस्त्रीसंबंध असल्याचा संशय घेत होत्या. या संशयावर त्यांनी पहाटे त्यांच्या सरकारी घरावर छापा टाकला आणि तिथे त्यांना त्यांचा नवरा दुसऱ्या महिलेसोबत दिसला.

गोंधळानंतर, मझियावान पोलीसांना माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी पोहोचले. मात्र, पळून जाण्याच्या प्रयत्नात सीओ प्रमोद कुमार यांनी छतावरून उडी मारल्याचे सांगितले जाते, ज्यात त्यांना किरकोळ दुखापत झाली. घरात सापडलेल्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पुढील चौकशीसाठी तिला महिलापोलीस ठाण्यात पाठवले.

माध्यमांशी बोलताना डॉ. श्यामा राणी यांनी सांगितले की त्यांना नवऱ्याच्या परस्त्रीसंबंधाचा बराच काळ संशय होता आणि आता त्या कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहेत. सरकारी अधिकाऱ्याशी संबंधित या प्रकरणाने झारखंडच्या प्रशासनात मोठी चर्चा निर्माण केली आहे, पण अधिकारी या संवेदनशील विषयावर काहीही बोलण्यास टाळत आहेत.

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ @Jlkmranchi या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकाने कमेंट करत लिहिलं, “मला याच्याबद्दल चांगलंच माहित आहे, तो जीतन राम मांझीचा नातेवाईक आहे आणि त्याचे हे कृत्य खूप जुने आहे.” तर दुसऱ्याने “सरकारी भ्रष्ट लोकांनो – हे लोक OYO मध्ये जोडप्यांना अटक करतात आणि स्वतः भ्रष्ट कृत्य करतात!” अशी कमेंट केली. तर एक कमेंट करत म्हणाला, “आता होईल जनतेचा विकास”