यूएस स्पेस एजन्सी नासाचा एक व्हिडीओ सोशल मीडियाचे सर्व रेकॉर्ड मोडत आहे. वास्तविक, ज्या प्रसंगी नासाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर केला तो एक खास दिवस होता. हा एक विशेष दिवस होता आणि तो म्हणजे राष्ट्रीय पिझ्झा दिवस, जो अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की पिझ्झा ही मूळची इटलीची डिश आहे, परंतु आता जगभरातील लोकांना ती खूप आवडू लागली आहे.
गुरूवर ‘पेपेरोनी’ वादळ!
यूएस स्पेस एजन्सी नासाने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ही तारीख होती १० फेब्रुवारी, ज्या दिवशी पिझ्झा प्रेमी अनेक देशांमध्ये ‘राष्ट्रीय पिझ्झा दिवस’ म्हणून साजरा करतात. त्या दिवशी गुरूवर आलेल्या वादळाच्या नासाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, काहीतरी खास तयार झाले होते, जे विशेषतः पिझ्झा डेशी जोडले होते. नासाने इंस्टाग्रामवर कॅप्शनमध्ये लिहिले, राष्ट्रीय पिझ्झा दिवस? ‘इंटरप्लॅनेटरी पिझ्झा डे’बद्दल काय? आमच्या जूनो मिशनने गुरू ग्रहावर ‘पेपेरोनी’ चक्रीवादळाचे शिखर पाहिले आहे.
(हे ही वाचा: विराट कोहलीचा श्रीवल्ली स्टाईल डान्स बघितला? शानदार कॅच घेतल्यानंतरचा Video Viral)
गुरूवर ‘पेपेरोनी पिझ्झा’चे टॉपिंग!
वास्तविक, आजकाल पिझ्झा हा भारतातही विशेषत: शहरांमध्ये अतिशय लोकप्रिय पदार्थ बनला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेपरोनी पिझ्झा पिझ्झाप्रेमींसाठी सर्वात आवडता मानला जातो. अशा परिस्थितीत जेव्हा गुरू ग्रहावर पेपरोनी पिझ्झाचे दर्शन घडते तेव्हा निसर्गाने या महाकाय ग्रहावर पेपरोनी पिझ्झाची प्रतिमा कशी कोरली आहे याचे पिझ्झाप्रेमींना आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे.
(हे ही वाचा: Video Viral: ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ गाण्यावरचा चिमुकल्याचा डान्स एकदा बघाच!)
(हे ही वाचा: IPL Auction 2022: लिलावादरम्यान सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेली कोण आहे ‘ही’ मिस्ट्री गर्ल?)
‘पेपेरोनी पिझ्झा’चा तपशील
स्वादिष्ट पिझ्झा आणि ज्युपिटर ‘पेपेरोनी’ वादळ यात मोठा फरक आहे. नासाने त्याबद्दल कॅप्शनमध्ये लिहिले, ‘तुम्ही येथे काय पाहता त्याबद्दल आणखी मसालेदार तपशील: हे गुरूच्या उत्तर ध्रुवाचे अवरक्त दृश्य आहे. आमच्या नासा सोलर सिस्टीम मिशन जूनो या जहाजावर असलेल्या Jovian Infrared Auroral Mapper (JIRAM) यंत्राद्वारे गोळा केलेल्या डेटामधून प्राप्त केलेली प्रतिमा या व्हिडीओमध्ये वापरली आहे.
(हे ही वाचा: ‘या’ फोटोत लपलेला साप तुम्ही शोधू शकता का? जुनी पोस्ट Viral)
इंटरनेटवर ‘पेपेरोनी’ वादळ व्हायरल
नासाच्या या पेपरोनी वादळाच्या व्हिडीओने इंटरनेटवर तुफान धुमाकूळ घातला आहे. फक्त इंस्टाग्रामवर याला १.९ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि त्याची संख्या सतत वाढत आहे. या व्हिडीओवर फॉलोअर्स मजेशीर कमेंटही करत आहेत.