Dog Walking Job: “नोकरी नाही मिळत” असे म्हणणाऱ्यांना धक्का देणारी ही बातमी सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कारण- त्यामध्ये जी नोकरीची जाहिरात दाखवण्यात आली आहे, ती ऐकून कुणाच्याही डोळ्यांत आश्चर्याचे भाव दिसून येतील. कारण- ही नोकरी आहे… कुत्रा फिरवण्याची (Dog Walker Job); पण मजेची बाब म्हणजे त्यासाठी वेगळं जॉब डिस्क्रिप्शन, ट्रेनिंग आणि जबरदस्त पगारही दिला जातो.
नोकरी नाही म्हणून हताश आहात? मग ही व्हायरल जॉब ऑफर ऐकाच, ना इंटरव्ह्यू, ना डिग्री… फक्त कुत्र्याला फिरवायचं आणि महिन्याला चांगला मिळणार. होय, ही भन्नाट जॉब व्हॅकन्सी सोशल मीडियावर प्रचंड गाजतेय. नेटिझन्स अक्षरशः चकित झालेत. कोणी म्हणतं “ही नोकरी मला दे”, तर कोणी म्हणतं “इंजिनियरिंग केल्यानंतरही मिळत नाही एवढा पगार.”
नेमकं काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?
इन्स्टाग्रामवर barbadbaalak नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती स्क्रीनकडे झूम करून दाखवत आहे, “तुम्ही म्हणता नोकरी नाही… बघा इथे काय आहे!” आणि त्यानंतर दिसते एक नोकरीची जाहिरात – कुत्रा फिरविण्यासाठी माणूस हवा आहे. या नोकरीच्या अटी आणि पात्रता फारच गमतीशीर आहेत : उमेदवार डॉग लव्हर असणं आवश्यक आहे. त्याच्याकडे बाईक किंवा स्कुटी आणि स्मार्टफोन असणं गरजेचं आहे. उमेदवाराला वेळेचं भान असावं लागेल. त्याला ट्रेनिंगदेखील देण्यात येणार आहे. शिफ्ट : सकाळी ६ ते ९ आणि संध्याकाळी ६ ते ८. आणि हो, पगार आहे थेट ११,००० ते ₹१८,००० रुपयांपर्यंत!
कुठे आहे ही भन्नाट संधी!
या जॉबची जागा दिल्लीमध्ये आहे. ही नोकरी किती जुनी आहे हे माहीत नाही; पण नेटिझन्सच्या मते, ती आजही खूपच आकर्षक आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये मजेशीर शैलीत लिहिलं आहे की, “मी तर निघालो भाऊ!”
युजर्सच्या भन्नाट प्रतिक्रिया:
हा व्हिडीओ आतापर्यंत ३३ हजारांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे. कमेंट्समध्येही युजर्सनी धमाल केली आहे. एकानं लिहिलं, “भाऊ, त्या साइटचं नाव सांग!” दुसऱ्यानं म्हटलं, “१८ हजार? एवढे तर आमच्या इंजिनियरिंगच्या पगारातही नाही मिळत!” आणखी एकाची मजेशीर प्रतिक्रिया “मी या जॉबसाठी क्वालिफाइड नाही!”
येथे पाहा व्हिडीओ
थोडक्यात काय?
जगात नोकऱ्यांची कमतरता नाही… फक्त डोळे उघडे ठेवून शोध घ्यायला हवा आणि हो, आता पुन्हा कोणी “मला नोकरीच मिळत नाही”, असं म्हणालं, तर त्या व्यक्तीला हा व्हिडीओ दाखवाच.