लठ्ठपणाचा विषय आला की सोशल मीडियावर आपण अनेक ‘बिफोर’ आणि ‘आफ्टर’ म्हणजे वजन कमी होण्यापूर्वीचे आणि वजन कमी झाल्यानंतरचे फोटो पाहतो. कोणत्याही व्यक्तीचं वजन काही एका झटक्यात वाढत नाही. त्यामुळे ते लगेचच कमी होईल अशी अपेक्षा करणंही चुकीचच आहे ना ! त्यासाठी कोणतीही ठराविक डेडलाइन नसते. ही एक सतत चालणारी प्रोसेस आहे. तुम्ही जितकी जास्त मेहनत कराल, तुम्हाला तेवढे उत्तम रिझल्ट्स दिसतील. अशातच काही लोक वजन कमी करण्यासाठी पोट कम करण्यासाठी काय काय करतील याचा नेम नाही. असाच एक झटपट पोट कमी करण्यासाठीचा वापरलेला जुगाड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही नक्कीच कपाळावर हात माराल.

विचीत्र व्यायामाचा video व्हायरल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, फिटनेस क्लास सुरू आहे. जिथं सर्वांच्या हातात लाटणं दिसत आहे. हे लोक लाटणं आपल्या दोन्ही हातात धरून पोटावर फिरवत आहे. पोळपाटावर चपाती लाटावी तसं ते आपलं पोट या लाटण्याने लाटत आहेत. पोटाची चरबी करण्यासाठी हे लोक असं करत असल्याचं सांगितलं जातं आहे. लाटणं ज्याने आपण चपाती लाटतो, ते लाटणं पोटावर फिरवून पोट सपाट केलं जात आहे. ही एक्सरसाइझ पाहून सर्व जण थक्क झाले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – आईसाठी कायपण! आई बरी व्हावी म्हणून मुलगा किडनी विकायला गेला अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. किरकोळ चुकांमुळे लोक आपले वजन कमी करू शकत नसल्याचे अनेकदा दिसून येते. त्यात हे असले अनोखे व्यायाम म्हंटलं की थोडी रिस्कच वाटते.