Viral Video Shows Anand Mahindra React on Dosa Printing Machine : रविवार असो किंवा आणखीन कोणता दिवस नाश्त्यासाठी सर्वाधिक दक्षिण भारतीय पदार्थ खाणे पसंत केले जातात. उपमा, इडली, मेदूवडा, डोसा, शिरा, उत्तप्पा हे पदार्थ नाश्त्यासाठी उत्तम तर आहेतच; पण ते पचायलाही हलके असतात. त्यामुळे हे पदार्थ प्रत्येक घरात आवर्जून बनवले जातात आणि स्टॉलवरही या पदार्थांच्या विक्रीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. पण, जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, आता तुम्ही प्रिंटिंग मशीनच्या साह्याने डोसा बनवू शकता, तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना… पण, आज सोशल मीडियावर अशाच एका विक्रेत्याची चर्चा होते आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) पाटणाचा आहे. फूड ब्लॉगर देवेश डबास याने एका डोसा विक्रेत्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या डोसा विक्रेत्याची खासियत म्हणजे त्याच्याकडे डोसा प्रिंटिंग मशीन आहे. व्हिडीओमध्ये डोसा विक्रेता मशीनवर डोशाचे पीठ, तेल आणि बटाट्याची भाजी ठेवतो. त्यानंतर डोसा प्रिंटिंग मशीन तिचे काम करण्यास सुरुवात करते आणि काही मिनिटांत कुरकुरीत डोसा तयार होतो. डोसा प्रिंटिंग मशीनच्या साह्याने तयार होणारा डोसा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…हेमंत सोरेन यांनी मोफत कफन वाटपाची केली घोषणा? VIRAL VIDEO चं नेमकं सत्य काय? वाचा

व्हिडीओ नक्की बघा…

डोसा प्रिंटिंग मशीन

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, सुरुवातीला विक्रेता डोसा प्रिंटिंग मशीनवर डोशाचं पीठ ओततो. त्यानंतर मशीनच्या साह्यानं हे पीठ पसरवलं जातं. त्यानंतर तो विक्रेता त्यावर तेल सोडतो. त्यानंतर बटाट्याची भाजी टाकताच मशीन डोसा रोल करून देते. डोसा बनविण्याच्या या प्रक्रियेला थोडी मेहनत कमी करून, तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. हा व्हायरल व्हिडीओ आनंद महिंद्रांनी पहिला आणि त्यांच्या अकाउंटवरून रिपोस्ट करीत या डोसा बनविण्याच्या पद्धतीला ‘द डेक्सटॉप डोसा’ असं एक खास नाव दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @MohiniWealth या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘२२ व्या शतकातील डोसा प्रिंटिंग मशीन’ अशी कॅप्शन फूड ब्लॉगरने व्हिडीओला दिली आहे. पण, हा व्हिडीओ पाहून नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. एक युजरनं, ‘तांदूळ आणि डाळ रात्रभर भिजवत ठेवून आंबवणे, सांबार व चटणी तयार करणे यापेक्षा मशीनच्या साह्यानं डोसा बनवण्यात कमी वेळ लागत असला तरीही या प्रक्रियेत मानवी स्पर्श सोडला जाऊ शकत नाही’, अशी कमेंट केली आहे.