Video Shows Banjo competition Start On School Ground : शाळेतील प्रत्येक दिवसाने प्रत्येकाच्या मनात आयुष्यभरासाठी घर केले आहे. शाळेतील मित्र, शाळेचा वर्ग, लाकडी बाक यांच्या आठवणी तर सांगाव्या तितक्या कमी आहेत. बाकावर डबा खाण्यापासून ते अगदी मधल्या सुटीत बाक वाजवण्यापर्यंतची शाळेतील मजा दुसरीकडे कुठेच करणे शक्य नाही. सुटीत बाक वाजवल्यावर मजा तर यायची. पण, जेव्हा शिक्षकांना समजायचे तेव्हा ओरडा पडल्याशिवाय सुटका व्हायची नाही. पण, सोशल मीडियावर आज काहीतरी वेगळं पाहायला मिळालं आहे.

व्हायरल व्हिडीओ गावाकडचा आहे. मैदानात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जमल्या आहेत. तसेच शिक्षिकेने मुलांच्या दोन गटांमध्ये स्पर्धा ठेवली आहे. बजरंग आणि रॉकी बँड अशी या दोन गटांची नावे ठेवून, त्यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. विद्यार्थी तुटलेल्या बादल्या आणि हातात काठ्या घेऊन, त्यांच्या पथकाद्वारे सादरीकरण करायला तयार आहेत. सुरुवातीला बजरंग बँड वाजवण्यास सुरुवात करतो आणि मग रॉकी बँड… तर शाळेतील विद्यार्थ्यांची बँजो स्पर्धा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

शिक्षिका केले स्पर्धेचे सूत्रसंचालन (Viral Video)

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, शिक्षिकेने मुलांना बँजो वाजवण्याची परवानगी दिली आणि दोन गटांमध्ये स्पर्धासुद्धा ठेवली. बजरंग आणि रॉकी बँडमध्ये जबरदस्त स्पर्धा रंगते. तसेच मुलांची बँजो वाजवण्याची आवड, त्यांचा उत्साह, त्यांची स्पर्धा जिंकण्याची जिद्द त्यांच्या चेहऱ्यावरून अगदी स्पष्ट दिसते आहे. तसेच मैदानात शिक्षिका या स्पर्धेचे सूत्रसंचालन करते आहे, तर जमलेले इतर विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसुद्धा त्यांना प्रोत्साहन देताना दिसत आहेत, जे पाहून तुम्हालाही शाळेचे दिवस नक्कीच आठवतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @zp_shikshasangini या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘आम्ही ग्रामीण भागातील मुले कुठेच मागे नाही’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून शाळेच्या जुन्या आठवणींत रमून गेले आहेत. काही जण उत्साहात त्यांच्या शाळेतील मित्र-मैत्रिणींनासुद्धा टॅग करताना दिसत आहेत आणि या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.