Viral Video Shows Boy Stuck On The Wall : सोसायटीतील किंवा चाळीतील मित्रांबरोबर खेळ खेळण्याची मजा काही वेगळीच असायची. खेळता-खेळता एखाद्याच्या गाडीची काच फुटायची किंवा शेजारच्यांची झोप उडायची. तर कधी धावताना पडून कोणत्या मित्राची ढोपर फुटायची अशा अनेक गोड आठवणी तुम्हालाही लहानपणीच्या नक्कीच आठवल्या असतील. पण, या संकटातून हीच मित्र सुखरूप बाहेर घेऊन सुद्धा यायची. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये एका मित्राला सुखरूप बाहेर काढण्यासाठी दुसऱ्या मित्रांचा जुगाड सुरु आहे.

व्हायरल व्हिडीओ मुलांचा आहे . मुलांचा एक ग्रुप खेळत असतात. पण, यादरम्यान काय घडते माहिती नाही. पण, घराच्या टेरेसवर काही मित्र उभे असतात. टेरेसच्या खाली असणाऱ्या मोकळ्या जागेत त्यांचा एक मित्र अडकलेला दिसतो आहे. मित्र आपल्याला सोडवतील याची वाट बघत तो गुपचूप तिथे बसलेला दिसतो आहे. तर सगळे मित्र मिळून घराच्या टेरेसवरून खाली येतात आणि त्याला खाली कसे आणायचे याबद्दल चर्चा करतात. त्यानंतर त्यांना एक दुचाकी दिसते. सगळे मित्र मिळून दुचाकी ढकलत ढकलत मित्र अडकला आहे तिथे आणतात.

टीम वर्क (Viral Video)

त्यानंतर एक मित्र दुचाकीवर चढतो. नंतर मित्राचा पाय पकडून त्याला उतरण्यास सांगतो. पण, मित्र थोडा घाबरतो. त्यानंतर दुसरा मित्र दुचाकीवरून चढून त्याला हिंमत देतो आणि पत्र्याला पकडून पटकन स्कुटीवर उडी मार असे म्हणतो. त्यानंतर सगळ्यांनी समजावल्यावर तो अखेर तयार होतो आणि स्कुटीवर अचूक उडी मारतो आणि सुखरूप खाली येतो. मित्र खाली उतरताच त्याला शाबासकी देतात. पण, मित्रांमुळे संकटात अडकल्यामुळे तो मस्करीत सगळ्यांना मारू लागला आणि इथेच व्हिडीओचा शेवट झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ नक्की बघा

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @chill_bro_0102 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून लहानपणीच्या आठवणीत रमून गेले आहेत आणि “टीम वर्क”, “वय, परिस्थिती काहीही असो, मित्रांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे”, “माझ्या लहानपणी सुद्धा असेच घडले होते”, “त्याने उतरल्यावर मित्राला मारले हे खूपच मजेशीर वाटले” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.