Viral Video Shows Sister And Brother Bond : आई-वडिलांनंतर आपल्या आयुष्यात कोणी खास असेल तर ती भावंडे असतात. एकमेकांशी भांड भांड भांडतील, त्यांचं एकमेकांशी कधीच पटणार नाही पण, त्यांना एकमेकांबद्दल प्रचंड माया असते हे ते कधीच दाखवणार नाहीत. अगदी वाढदिवस असो किंवा एखादा खास क्षण काहीतरी खोड्या केल्याशिवाय ही भावंडे अजिबात राहणार नाहीत. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ; यामध्ये बहिणीच्या लग्नातला भावाचा मजेशीर क्षण व्हायरल होतो आहे.

व्हायरल व्हिडीओत भावाच्या लाडक्या बहिणीचे लग्न असते. बहिणीच्या लग्नाच्या विधी सुरु असतात. यादरम्यान भावाला भावजींच्या पायाला त्याला हळद लावायची असते. त्यासाठी एका हातावर दुसरा हात ठेवून हळद भावजींच्या पायाला लावायची असते. त्यानंतर भावजींच्या पाया पडायच्या असतात. पण, हळद लावताना भटजींनी एका हातावर दुसरा हात ठेवायला सांगितल्यामुळे त्याचा भरपूर गोंधळ उडतो आणि त्याला पाया कशा पडाव्या हेच कळतं नसते. पंडितजी त्याला समाजवतात आणि ‘अरे फक्त विधी दरम्यान एका हातावर एक हात ठेव. त्यानंतर हात नेहमीप्रमाणे ठेवून तू पाया पडू शकतोस’ ; असे म्हणतात.

भाऊ हातवारे करतच राहिला (Viral Video)

तुम्ही अनेकदा लग्नाच्या विधीदरम्यान नवरीला प्रचंड भावूक होताना किंवा रडताना पहिले असेल. पण, आज व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, भावाच्या मजेशीर कृतीने नवरीच्या चेहऱ्यावर हसू आले आणि ती प्रचंड हसताना दिसली आहे. भावाचा विधी दरम्यान गोंधळ उडाला आणि बहिणीच्या चेहऱ्यावर त्याच्या निरागसपणामुळे हसू आले; त्यामुळे या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडताना दिसतो आहे. भावा-बहिणीचा व्हायरल व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @muskan_gaur55 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘इथेही माझ्या भावाने गडबड केली’ अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. “नवरी पोट धरून हसते आहे”, “पंडितजींनी सांगितले नसते तर कदाचित भाऊ हातवारे करतच राहिला असता”, “खूपच निरागस भाऊ आहे”, “बहिणीला निरोप देताना तिला हसवून गेला”, “कदाचित बहिणीला हसवण्यासाठी तो करत असेल” ; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.