Video Shows Dad Becomes A Dancer Partner For Daughter : बाबांसाठी लेक महत्त्वाची का असते हे खरं तर शब्दात मांडणे कठीण आहे. बाबांसाठी घरातील प्रत्येक व्यक्तीच खास असते, पण लेक श्वास असते. प्रत्येकाला आनंदाचे क्षण अनुभवता यावे यासाठी आईइतकेच बाबासुद्धा धावत असतात. फरक इतकाच; आईची काळजी, प्रेम दिसते तर बाबांचे प्रेम कुठेतरी लपून राहते. मग कधी कधी नकळत त्यांच्या कृतीतून आपसूकच दिसून येते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये बाबांनी आपल्या लेकीसाठी काहीतरी खास केलं आहे.
व्हायरल व्हिडीओत लेकीचा डान्स पर्फोमन्स असतो. लेकीचा डान्स पर्फोमन्स पाहण्यासाठी बाबासुद्धा हजर राहतात. पण, कोणत्यातरी कारणामुळे लेकीचा डान्स पार्टनर डान्स पर्फोमन्स स्टेजवर उपस्थित नसतो. डान्स सुरू होतो आणि सगळे आपापल्या डान्स पार्टनरबरोबर डान्स करण्यास सुरुवात करतात. मात्र, निराश न होता लेक एकटीच नाचत असते. लेकीला एकटीला नाचताना पाहून बाबांना रहावत नाही. त्यानंतर बाबा स्टेजवर चढतात आणि लेकीच्या जवळ जातात.
बाबा आल्यावरच तिचा आनंद बघण्यासारखा होता (Viral Video)
लेकीला एकटं नाचताना पाहून बाबा स्टेजवर चढतात आणि तिच्याबरोबर डान्स करण्यास सुरुवात करतात. त्यानंतर लेकीच्या डान्स पार्टनरची कमतरता पूर्ण होते आणि ती आनंदाने उडी मारते आणि डान्स करू लागते. बाबा इतर मुलांच्या स्टेप्स बघून तिच्याबरोबर डान्स करण्याचा प्रयत्न करत असतात. बाबांची ही खास कृती पाहून प्रेक्षकांमध्येपण एकच जल्लोष दिसला आणि ते टाळ्या वाजवून बाबा आणि लेकीचा डान्स संपेपर्यंत त्यांना प्रोत्साहन देताना दिसले, जे पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल. एकदा बघाच हा व्हायरल व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @unic_orn_of_nella या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून ‘बाबांच्या येण्याआधीचा तिचा आत्मविश्वास आणि बाबा आल्यावरचा तिचा आनंद बघण्यासारखा आहे’; तिचे वडील आल्यावर तिने आनंदाने उड्या मारल्या’, ‘वडिलांना परी आणि लेकीला चांगल्या हृदयाचे बाबा भेटले आहेत’ आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.