Video Shows Daughter Takes Parents To US Office : मुलांना शाळेत सोडायला येण्यापासून ते ऑफिसमध्ये आई-बाबांना घेऊन जाण्यापर्यंतचा प्रवास खूपच हृदयस्पर्शी असतो. आपण काहीतरी करून दाखवलं यांचा आनंद मुलांना आणि आपलं मुलं स्वतःच्या पायावर उभं राहणं याचा अभिमान आई-बाबांना शब्दात सांगणं खरतर कठीण असतं. आज असाच काहीसा प्रवास व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळाला आहे. एका लेकीने आपल्या आई-बाबांना ऑफिस दाखवायला अमेरिकेत घेऊन गेली आहे; जे पाहून आपल्याही आयुष्यात हा क्षण यावा असे तुम्हाला वाटेल.
कदाचित प्रत्येक मुलांना हेच हवे असते (Viral Video)
व्हायरल व्हिडीओ अमेरिकेतील आहे. अमेरिकेतील वॉलमार्ट कंपनीच्या मुख्यालयात काम करणाऱ्या देवश्री भारती या तरुणीने व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तर या वॉलमार्ट कंपनीत देवश्री तिच्या आई-वडिलांना घेऊन आली आहे. देवश्री आई-बाबांना कंपनीच्या अनेक विभागांमध्ये घेऊन जाते, ज्यात जिम, मीटिंग रूम यांचा समावेश असतो. एवढे मोठे ऑफिस पहिल्यांदांच पाहिल्यामुळे , ऑफिसमधील सोयी-सुविधा पाहून, चेहऱ्यावर हास्य ठेवून ते इकडे-तिकडे बघताना दिसत आहेत आणि आपल्या लेकीने करून दाखवलं हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकताना दिसतो आहे.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, आई-बाबा ऑफिसात येण्यापासून ते अगदी ऑफिसमधील प्रत्येक विभागांमध्ये जाईपर्यंत लेक प्रत्येक क्षण टिपून घेत असते. यादरम्यान ती आई-बाबांबरोबर सेल्फी सुद्धा काढते आणि या खास क्षणाचा व्हिडीओ बनवून पोस्ट करते. जे आई-बाबांना नाही करता आलं त्याची संधी आणि परवानगी त्यांनी लेकीला दिली. लेकीने त्या संधीचे सोने करून आई-बाबांनी कधी न पाहिलेले अमेरिकेतील वॉलमार्ट कंपनीच ऑफिस त्यांना अगदी अभिमानाने दाखवलं आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @devshree.17 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “माझे पालक पहिल्यांदाच अमेरिकेतील माझ्या वॉलमार्ट ऑफिसला भेट देत आहेत. त्यांनी कधीही इतके मोठे ऑफिस पाहिले नव्हते आणि पहिल्यांदाच जेव्हा त्यांनी सुविधा पाहिल्या तेव्हा ते आश्चर्यचकित आणि खूप आनंदी झाले. अभिमानास्पद क्षण… कदाचित प्रत्येक मुलांना हेच हवे असते” ; अशी कॅप्शन तिने व्हिडीओला दिली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “ही गोष्ट खूपच अभिमानास्पद आहे” ; असे व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.