सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही त्यांच्या गोंडस हावभावाने नेटकऱ्यांची मनं जिंकणारे असतात, तर काही त्यांचे भयानक रूप दाखवून थक्क करणारे असतात. काही वेळा तर प्राण्यांची माणसांप्रमाणे केलेली वागणूक पाहून आपण अचंबित होतो. अशी हुबेहूब नक्कल करण्यात आलेले अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील. असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कुत्रा गणपती बाप्पाला दंडवत घालत असल्याचे दिसत आहे.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ‘थ्रीफ्टस ग्रेस’ (thrifts_grace) या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक कुत्रा गणपती बाप्पासमोर दंडवत घालताना दिसत आहे. त्याच्या मालकाबरोबर तो मंदिरात आला असल्याचे दिसत आहे. प्राण्यांमध्ये देखील भक्ती ही भावना असते, हे या व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे. कुत्र्याची ही भक्ती पाहून नेटकरी अचंबित झाले आहेत. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
Viral Video : थेट पर्यटकांच्या गाडीत शिरली सिंहीण; पुढे काय झाले एकदा पाहाच
व्हायरल व्हिडीओ :
या व्हिडीओला १५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, या व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.