Video Shows Man Carries Groom On His Shoulder : आयुष्यात एखादा तरी चांगला मित्र असणे खूप गरजेचे असते. कारण- मित्र पावसाळ्यात छत्री, तर उन्हाळ्यात सावलीचे काम करणारा असतो. म्हणजेच खरा मित्र कठीण काळात आपल्याबरोबर उभा राहतो. तो चुकांवर पांघरूण न घालता, आपल्याला त्या चुका वेळोवेळी दाखवून देतो. सुख-दु:खाच्या काळात तो तुमच्याबरोबर सहभागी होतो. जेव्हा मित्र तुमच्याबरोबर असतो तेव्हा तुमच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक असते आणि प्रत्येक दुःख आनंदात बदलते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

सध्या लग्नसराई सुरू आहे आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणी अवकाळी पाऊससुद्धा पडतोय. त्यामुळे लग्नमंडपातही अनेकांची तारांबळ उडताना दिसते आहे. कोणी छत्री घेऊन लग्नसोहळ्यात सहभागी होतंय, तर काही जण भरपावसात लग्न लावताना दिसत आहेत. अशातच आणखीन एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे आणि त्यामध्ये नवरदेवाला मंडपात घेऊन जाण्याची तयारी सुरू आहे. पण, यादरम्यान प्रचंड पाऊस पडताना दिसतो आहे. तर नवरदेवाच्या मित्रानं यासाठी जबरदस्त जुगाड शोधून काढला आहे.

हे फक्त एक मित्रच करू शकतो (Viral Video)

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एकच छत्री असल्यामुळे नवरदेवाच्या मित्रानं त्याला खांद्यावर बसवलं आहे. एवढंच नाही, तर नवरदेवाला छत्री डोक्यावर पकडायला सांगून मित्र स्वतः भिजतो आहे. नवरदेवाला खांद्यावर बसवून, तो त्याला मंडपात घेऊन जाताना दिसतो आहे. नवरदेवानं घातलेला ड्रेस खराब होऊ नये आणि तो भिजू नये म्हणून मित्रानं असा जबरदस्त जुगाड केलेला दिसतो आहे. भरपावसात रस्त्याच्या कडेनं आपल्या मित्राला खांद्यावर बसवून घेऊन तो जातो आहे हे पाहून एका अज्ञात व्यक्तीने त्याचा व्हिडीओ शूट करून घेतला आणि ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’, अशी कॅप्शन दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @sopya_bhashet_meme या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘भावा, इथपर्यंत साथ पाहिजे मला तुझी’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून मजेशीर, तर मैत्री काय असते हे त्यांच्या शब्दांत सांगताना दिसत आहेत. “रंगुनी रंगात सारे या जगही विसरून जावे मित्रा तू बरोबर असावे, त्या वेळेस हे जगही नसावे”, “हे फक्त एक मित्रच करू शकतो… बाकी जगातलं कुठलंच नातं हे नाही करू शकत” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.