Video Shows Little Boy Dream To Make Filmmaker : मोठेपणी तुला काय व्हायचं आहे असे विचारल्यावर आपल्याकडे स्वप्नांची यादीच तयार असायची. मालिका, चित्रपटात पाहिलेल्या अनेक भूमिका मनात बसायच्या आणि मग हेच मला मोठेपणी व्हायचं आहे, असे आपण लहानपणी स्वप्न उराशी बाळगायचो. तर काही जण लहानपणी पाहिलेले स्वप्न पूर्ण करतात, तर अनेक जण वेगळा मार्ग निवडतात; तर आज अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये चिमुकल्याला मोठेपणी दिग्दर्शक (Filmmaker) बनायचे असते.
व्हायरल व्हिडीओत एक अज्ञात व्यक्ती काही चिमुकल्यांचा व्हिडीओ शूट करत असते. त्यातील एका चिमुकल्याला, ‘तूला मोठेपणी काय करायचं आहे’ असे व्यक्ती विचारते. यावर चिमुकला ‘मी खूप काही करणार आहे’ असे सहज बोलून जातो. ‘खूप काही म्हणजे नेमकं काय’ असे अज्ञात व्यक्ती म्हणते. यावर चिमुकला ‘नोकरी किंवा सिनेमा (फिल्म) बनवणार’ असे बोलतो. तसेच या सिनेमात अज्ञात व्यक्ती आणि बाजूला उभ्या असणाऱ्या दोन्ही मुलींनासुद्धा घेणार असेसुद्धा आवर्जून म्हणतो.
व्हिडीओचा शेवट असा असेल अशी आम्ही अपेक्षा सुद्धा केली नव्हती (Viral Video) :
त्यानंतर अज्ञात व्यक्ती त्याचे कौतुक करण्यास सुरुवात करते. पण, इथेच व्हिडीओमध्ये मजेशीर ट्विस्ट येतो. ‘तुझ्या सिनेमात हिरो कोण असणार’ असे शेजारी उभी असणारी चिमुकली विचारते. त्यानंतर चिमुकला अज्ञात व्यक्तीकडे इशारा करून म्हणतो, ‘हा काय माझ्या सिनेमाचा हिरो.’ पण, त्यानंतर आपल्या मैत्रिणीची थट्टा करण्यासाठी ‘तुला या सिनेमात काय करायचं आहे माहिती आहे का’, तर आश्चर्याने ती ‘काय’ विचारते. त्यानंतर चिमुकला म्हणतो, ‘तुला पाण्यात हळूहळू उतरायचं आहे.’ पण, ‘का’ असे पुन्हा एकदा मैत्रीण विचारते. त्यावर चिमुकला म्हणतो, सिनेमा बनवणार तर त्याचे नाव तर ठेवावं लागणार ना, ‘गयी भैंस पानी में’ असे अगदी मजेशीर पद्धतीने म्हणतो आणि जमलेल्यांमध्ये एकच हशा पिकतो.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @memeslogist या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘दिग्दर्शक’; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. सिनेमा बनवण्याची आणि त्याचे नाव ठेवण्याची चिमुकल्याची स्टाईल आणि त्याचा आत्मविश्वास पाहून नेटकरीसुद्धा थक्क झाले आहेत आणि मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत. ‘व्हिडीओचा शेवट असा असेल अशी आम्ही अपेक्षासुद्धा केली नव्हती’, ‘सिनेमाची स्क्रिप्ट तर मस्तच आहे’ आदी अनेक कमेंट नेटकरी करताना दिसत आहेत.