Video Shows Little Girl Teaching Pet Cats : मुलांना अभ्यासाला बसवणे वाटते तितके सोपे नसते. अभ्यास करायला बस, अगदी एवढे जरी म्हटले तरीही लहान मुलांना भूक लागते, अगदी झोपसुद्धा येते. मग ओरडून, मारून त्यांना अभ्यास करायला बसवावे लागते. तुम्ही आतापर्यंत अनेक लहान मुलांना मनाविरुद्ध अभ्यास करीत असल्याचे पाहिले असेल. पण, तुम्ही कधी मांजरांना अभ्यास करताना पाहिले आहे का? नाही… तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, त्यामध्ये चक्क चिमुकली दोन पाळीव मांजरींना शिकविताना दिसते आहे.

व्हायरल व्हिडीओत (Video) चिमुकलीने दोन मांजरांना चक्क खुर्चीवर बसवले आहे. त्यांच्यासमोर टेबलावर काही पुस्तके आणि वह्या ठेवल्या आहेत. तसेच चिमुकली समोर उभी राहून या दोन्ही मांजरींना शिकविताना दिसते आहे. चिमुकली फळ्यावर काहीतरी लिहून, ‘तुम्हाला समजतंय का?’ अशा हावभावांमध्ये दोन्ही मांजरींना विचारताना दिसते आहे. तसेच दोन्ही मांजरी एकमेकींकडे बघून ‘हे नक्की काय चाललंय’, असे मजेशीर हावभाव देताना दिसत आहेत. चिमुकलीने मांजरींचा कसा अभ्यास घेतला ते…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, चिमुकली तिच्या मित्र-मैत्रिणींबरोबर नाही, तर तिच्या पाळीव मांजरींबरोबर शाळा-शाळा खेळते आहे. तिने दोन्ही मांजरींना अगदी विद्यार्थ्यांप्रमाणे बसवले आहे आणि ती स्वतः शिक्षिका बनली आहे. एवढेच नाही, तर ती फळ्यावर लिहून मांजरींना शिकवतेसुद्धा आहे. त्या दोन्ही मांजरी खुर्चीवर गप्प बसलेल्या दिसत आहेत आणि मधेमधे एकमेकींकडे बघतसुद्धा आहेत. घरात उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हा मजेशीर क्षण मोबाईलमध्ये कैद करून घेतला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला.

‘वो स्त्री है, वो कुछ भी कर सकती है’…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @trendruiners या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून चकित झाले आहेत. तिने दोघींना अभ्यास करण्यासाठी कसे तयार केले असेल?, लक्षात ठेवा ती मुलगी आहे म्हणून तिच्यासाठी सर्व काही शक्य आहे, वो स्त्री हैं वो कुछ भी कर सकती हैं, बोर्डाच्या परीक्षेची तयारी आदी प्रतिक्रियांवरून नेटकरी व्हिडीओ बघून पोट धरून हसत असावेत, असे वाटते. एकूणच सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.