Video Shows Man Counted Every Single Hair On His Head : अनेकदा आपल्या डोक्यात अनेक विचित्र विचार येतात. एका माठात किती थेंब पाणी असेल, एका कलिंगडात किती बिया असतील आणि अगदी आपल्या डोक्यावर किती केस असतील आदी अनेक प्रश्न तुमच्याही मनात नक्कीच येत असतील. पण, असे जर कोणी खऱ्या आयुष्यात करून दाखवले तर तुमचा विश्वास बसेल का? नाही… तर आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्याने आपल्या डोक्यावरील प्रत्येक केस मोजून दाखवला आहे; जे पाहून तुम्ही थक्कच होऊन जाल.
इन्स्टाग्राम व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एका माणसाने त्याच्या डोक्यावरील प्रत्येक केस मोजण्यात पाच दिवस घालवले आणि असा प्रयत्न करणारा ही पहिलीच व्यक्ती असल्याचा दावा केला आहे. पण, अजूनही त्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळालेला नाही. कंट्रीमॅन या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, यामध्ये एक तरुण पाण्याने आपले केस धुतो आणि ट्रिमरच्या सहाय्याने डोक्यावरचे सगळे केस काढतो आणि सर्व केस काळजीपूर्वक गोळा करतो. त्यानंतर तो प्रत्येक केस मोजण्यास सुरुवात करतो. एकदा बघाच हा अविश्वसनीय व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, ट्रिम केल्यानंतर तो डोक्यावर कॅप घालतो आणि केस मोजण्यास सुरुवात करतो. असे तो पाच दिवस अगदी १० ते १२ तास तास केस मोजण्यात घालवत होता. आकडा लक्षात राहण्यासाठी त्याने दगडांचा वापर केला . प्रत्येक हजार केसांसाठी एका प्लेटमध्ये तो एक दगड ठेवतो. त्याला जाणवले की, यापूर्वी कोणीही असा प्रयत्न केला नव्हता. त्यामुळे प्रेरणा घेऊन त्याने लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सना ईमेल पाठवले. पाचव्या दिवशी अखेर त्याला प्रतिसाद मिळाला. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्याची विनंती नाकारली, तर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्याच्या प्रवेशाचा विचार करण्यासाठी $१,२०० (अंदाजे १,०३,००० रुपये ) मागितले. पैसे खर्च करण्यास तयार नसल्याने त्याने विश्वविक्रम करण्याचा विचार सोडून दिला. शेवटी, त्याने ९१ दगड मोजले, ज्याचा त्याच्या गणितानुसार त्याच्या डोक्यावर ९१,३०० केस आहेत.
माझे बालपणीचे स्वप्न पूर्ण केलंस (Viral Video ) :
तर सोशल मीडियावर @countryman.ind या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे, त्याला १.४ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडिया युजर्स तरुणाच्या या कृतीला निव्वळ मूर्खपणा म्हणत आहेत. तर काही जण दररोज २० केस गळण्याचे दुःख कमी झाले असे सुद्धा म्हणत आहेत. तू माझे बालपणीचे स्वप्न पूर्ण केलेस म्हणून त्यामुळे मी आता शांतपणे मरू शकतो अशी मजेशीर कमेंट केली आहे. अगदी ब्रँड आणि अनेक प्रसिद्ध लोकांनी सुद्धा वेगवेगळ्या शब्दात माणसाच्या या कृतीसाठी खास कमेंट केलेल्या दिसत आहेत.