Viral Video Of Thirsty Dog : कान व शेपटी हलवणे वा चाटणे अशा क्रियांद्वारे श्वान माणसांवरील प्रेम व्यक्त करतात वा आपल्यावरील आस्था दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. मग हेच श्वान आपल्याकडूनही प्रेमाची अपेक्षा ठेवतात. सध्या दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी प्राणी-पक्ष्यांचेसुद्धा हाल होत आहेत. यादरम्यान अनेक जण पाळीव किंवा भटक्या प्राण्यांसाठी घराबाहेर, बादलीत किंवा वाडग्यात पाणी ठेवतात; जेणेकरून उन्हातान्हातून फिरणाऱ्या मुक्या प्राण्यांची तहान भागवली जाईल. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका भटक्या श्वानाला पाणी देताना एक व्यक्ती दिसते आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) एक अनोळखी व्यक्ती व श्वान यांचा आहे. एक भटका श्वान पाण्याच्या शोधात होता. हे पाहून एक व्यक्ती त्याच्याजवळ असणाऱ्या वॉटर डिस्पेंसरमधील पाणी त्याला देते. आसपास कोणताही ग्लास किंवा भांडे नसल्यामुळे हातावर पाणी घेऊन ते तो माणूस श्वानाला पाजतो. हाताची ओंजळ करून, त्यात वॉटर डिस्पेंसरमधील पाणी तो घेतो आणि श्वानाजवळ जातो. तहानलेला श्वानदेखील स्वतःची तहान त्या पाण्याने भागवतो. कशा प्रकारे त्या अनोळखी माणसाने श्वानाची मदत केली ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा….VIRAL VIDEO : दिलजीत दोसांझचा लाइव्ह कॉन्सर्ट पाहण्यासाठी देशी जुगाड; हॉस्टेलच्या तरुणांचा हा प्रताप पाहून पोट धरून हसाल

व्हिडीओ नक्की बघा…

दोन्ही हातांची ओंजळ करून श्वानाला पाजले पाणी…

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, पाण्याला कधीच कुणाला नाही म्हणू नये, असे अनेकदा म्हटले जाते. बाहेर खूप ऊन असेल आणि पोस्टमन एखादा पत्र घेऊन आला किंवा एखादी डिलिव्हरी बॉय एखादे पार्सल घेऊन आला की, आपण सगळेच त्यांना पाणी हवे का म्हणून विचारतो. तर असेच काहीसे या व्हिडीओतसुद्धा पाहायला मिळाले आहे. भटका श्वान पाण्याच्या शोधात इथे-तिथे फिरत होता. तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने वॉटर डिस्पेंसरमधून दोन्ही हातांची ओंजळ करून, त्याद्वारे पाणी घेऊन, ते श्वानाला पाजले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ या @yng._.dn इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘फक्त विचार करा तुम्हाला खूप तहान लागली आहे आणि तुम्ही मुके आहात किंवा तुम्हाला बोलता येत नाही’, अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून भटक्या श्वानांबद्दल चिंता व्यक्त करताना दिसत आहेत आणि अनोळखी व्यक्तीचे कौतुक करताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.