Video Shows Friend Overcome with Emotion at Best Friend’s Wedding : मैत्री हे जगातलं सगळ्यात सुंदर नातं असतं असं म्हणतात. अशातच आयुष्यात तुमचा एक जरी चांगला मित्र असेल तर तुमच्या अनेक समस्या सुटतात. कारण – हा एक मित्रच तुमच्या चांगल्या आणि वाईट काळात तुमच्या पाठीशी उभे राहतो. त्या मित्राने तुमच्या आयुष्यातील चढ-उतार अगदी जवळून पाहिलेले असतात. पण, जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा याच मित्रांच्या डोळ्यांत आनंदाश्रू येतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; मित्राला पाहून दुसऱ्या मित्राच्या डोळ्यांत पाणी आले आहे.
व्हायरल व्हिडीओ लग्न संभारातील आहे. एका मित्राने त्याच्या आवडत्या मित्राच्या रिसेप्शनला हजेरी लावलेली दिसते आहे. नवरी आणि नवरदेव यांना शुभेच्छा देण्यासाठी मित्र स्टेजवर जातो. दोघांनाही शुभेच्छा देतो आणि नवरदेवाच्या पाठीवर हात थोपटतो. तेव्हाच मित्राच्या डोळ्यांत पाणी आलेले असते. पण, नवरदेवाचा खास दिवशी त्याला अजिबात रडवायचे नसते. नंतर तिघांचाही फोटो काढला जातो. मात्र तेव्हा नवरदेवाला भरून येत आणि तो रडण्यास सुरुवात करतो.
खूप कमी लोकांच्या नशिबात असते अशी मैत्री असते (Viral Video)
नवरी आणि नवरदेव यांना शुभेच्छा देण्यासाठी मित्र स्टेजवर जातो. एकमेकांचा संघर्ष पाहिलेल्या मित्रांच्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली हे पाहून मित्राच्या डोळ्यांत पाणी आलेले असते. पण, नावरदेवाकडे बघून तो शांत बसतो. पण, मग तिघांचा फोटो काढला जात असतो तितक्यात नवरदेव चष्मा काढून मागे वळतो आणि रडण्यास सुरुवात करतो आणि मित्राला घट्ट मिठी मारतो. ‘जेव्हा तुम्ही एकमेकांच्या संघर्षाचे सोबती असता तेव्हा आनंदाचे क्षण तुमचे आनंदाश्रू रोखू शकत नाही’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @devwrites_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘जर तुम्हाला माझ्या वाईट काळात माझी काळजी नसेल, तर तुम्हाला माझ्या चांगल्या काळात माझ्यासोबत राहण्याचा अधिकार नाही’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत आणि “खूप कमी लोकांच्या नशिबात असते अशी मैत्री असते”, “आणि बरेच जण म्हणतात पुरुषांना भावना नसतात ही रील पाहिली आणि डोळे पाणावले”, “अरे दादा तुमच्या मैत्रीला कोणाची नजर ना लागो” ; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.