Video Shows Thief steals Woman Chain From Moving Train : एक्स्प्रेस असो किंवा लोकल ट्रेन प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाला अतिरिक्त काळजी घ्यावी लागते. कोण, कधी संधीचा फायदा घेत तुमचे मौल्यवान सामान चोरून पळ काढेल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे आपण अनेकदा बॅगला टाळ लावून किंवा बॅगेतील सुरक्षित कप्यात आपल्या मौल्यवान वस्तू ठेवतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये ट्रेनच्या गेटवर उभ्या असलेल्या चोर महिलेच्या गळ्यातील मौल्यवान वस्तू चोरून घेऊन गेला आहे.

व्हायरल व्हिडीओत ट्रेन मधला आहे. स्लीपर कोचमध्ये एक महिला वॉशरूममधून बाहेर येते आणि वॉशबेसिनजवळ उभी राहून हात धुत असते. दरम्यान, ट्रेनच्या दरवाजाजवळ एक माणूस महिलेच्या येण्याची वाट बघत असतो अशा पद्धतीने उभा असतो. महिला वॉशबेसिनजवळ पोहोचताच, तो लगेच तिच्या गळ्यात घातलेली चैन ओढू लागतो. चोर गळ्यातली चैन ओढण्यासाठी सगळी ताकद वापरतो ; जे महिला आणि त्याच्या जीवासाठी खूप धोकादायक असू शकते दिसते आहे.

स्वतःच्या ट्रेन अपघाताची चोरी केली का (Viral Video)

मध्यरात्री घरात शिरून दागिने, पैसे आणि दागिने चोरण्याचा प्रयत्न करणारे अनेक जण असतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी असो किंवा घरी आपल्या सामानाची चोरी होऊ नये यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. पण, आज या चोराने अगदी चालत्या ट्रेनमध्येच चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी सुद्धा झाला. पण, चोरीच्या नादात महिलेच्या गळ्यातील चैन खेचताना चोराचा तोल जातो आणि तो चालत्या ट्रेनमधून थेट खाली पडतो. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ एकदा बघाच…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ @itisprashanth या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “जर तुमच्या अघरच्या वृद्ध महिला ट्रेनमध्ये प्रवास करत असतील तर कृपया व्हिडिओ बघा आणि त्यांना सतर्क करा” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून “ट्रेनमधून खाली पडल्यावर तो नक्कीच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला असणार”, “त्याने स्वतःच्या ट्रेन अपघाताची चोरी केली का” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.