Viral video of lion cubs : आपल्यातील अनेकांनी लहानपणी मित्र-मैत्रिणींबरोबर अनेक खेळ खेळले असतील. त्यात लपंडाव, कब्बडी, डब्बा ऐसपैस, चोरचिठ्ठी आदींचा समावेश असायचा. त्यातला एक खेळ तुम्हाला आठवतोय का? एकमेकांच्या डोळ्यांकडे बराच वेळ बघत राहायचे आणि जो पहिल्यांदा डोळे बंद करील तो आऊट. हा खेळ खेळताना अनेकदा मुद्दाम चीटिंगसुद्धा केली जायची. तर आज असाच एक स्टेरिंगचा व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये सिंहाचे तीन शावक कॅमेऱ्याकडे पाहून हा स्टेरिंगचा खेळ खेळताना दिसत आहेत.

व्हायरल व्हिडीओ (Video) दक्षिण आफ्रिकेतील आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सफारी लॉज सिंगितामध्ये सिंहाच्या तीन शावकांचा एक सुंदर क्षण कॅप्चर करण्यात आला आहे. जंगलात एक भिंत दिसते आहे; पण खास गोष्ट म्हणजे भिंतीआडून किंवा भिंतीवर डोके ठेवून सिंहाचे तीन शावक एकटक पाहत आहेत. त्यांचे डोळे, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव अगदीच पाहण्यासारखे आहेत. कॅमेऱ्याकडे लक्षपूर्वक पाहत असलेल्या या शावकांचा गोंडस क्षण तुम्हालाही पाहायचा असेल, तर तुम्हीसुद्धा हा व्हिडीओ एकदा पाहाच…

हेही वाचा..५० रुपयांत जेवण देणाऱ्या विक्रेत्याचं आनंद महिंद्रांनी केलं कौतुक; VIDEO शेअर करीत म्हणाले, ‘देशाची महागाई …’

व्हिडीओ नक्की बघा…

जंगलातील तीन शावकांचा VIDEO :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, व्हिडीओची सुरुवात भिंतीवर डोकं ठेवून, एकत्र बसलेल्या तीन शावकांच्या क्लोजअपसह सुरू होते. प्रत्येक जण थेट कॅमेऱ्याकडे टक लावून पाहतो आहे. व्हिडीओ जसजसा पुढे जातो तसतसा कॅमेरा प्रत्येक शावकावर फोकस करतो. त्यांच्या हलक्याशा कृतींना, गोंडस हावभावांना हायलाइट करतो आहे. जणू काही कॅमेरा किंवा फोटोग्राफरसह स्टेरिंगचा गेमच खेळत आहे. तुम्ही आतापर्यंत वाघ, सिंह, हत्ती यांना इतर प्राण्यांवर हल्ला करताना पाहिलं असेल. पण, हा गोंडस व्हिडीओ तुमच्या मनातली ही भीती काही क्षणांसाठी नक्की घालवू शकेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @singita_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओला ‘स्टेरिंग स्पर्धा… दक्षिण आफ्रिकेच्या सफारी लॉज सिंगिता येथे त्यांना सिहांच्या शावकांचा गोंडस क्षण आणि सिंह, बिबट्या, चित्ता यांच्या पिल्लांचे त्यांच्या आईबरोबर काही सुंदर क्षण पाहायला आम्हा पर्यटकांना पाहायला…’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. हा व्हिडीओ पाहताना सिंहाच्या शावकांवरून नेटकऱ्यांची नजर हटत नाही आहे आणि ते त्याला जंगलाचा छोटा राजा म्हणत असल्याचे कमेंट सेक्शनमध्ये सांगताना दिसत आहेत.