Video Shows Unique Pencil Shop with 1 Million Designs : आपल्यातील अनेकांना कोणत्या ना कोणत्या गोष्टी गोळा करण्याचा छंद असतो. एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर तेथील आगळेवेगळे दगड गोळा करणे, एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी गेल्यावर तेथील नाणी गोळा करणे, पुस्तके, कलाकृती, प्राचीन वस्तू, इतर देशांची तिकिटे आदी अनेक गोष्टी गोळा करायला आपल्या सगळ्यांनाच भरपूर आवडतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये इराकची राजधानी बगदाद येथे असेच एक पेन्सिलींचे दुकान आहे; जिथे पेन्सिलींच्या चक्क १ दशलक्ष (दहा लाख) डिझाइन्स आहेत.

भारतीय ट्रॅव्हल व्लॉगर अंकिता कुमारीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. इराकची राजधानी बगदाद येथे अली अल मंडलावी हे ४० वर्षांपासून एक अनोखे दुकान चालवीत आहेत. कन्टेन्ट क्रिएटरने दुकानात पाऊल ठेवताच वेगवेगळ्या रंगांच्या अगरबत्ती लावलेल्या असतात, अगदी त्याचप्रमाणे भिंतींमध्ये खण करून त्यांनी सगळ्या पेन्सिली लावून ठेवल्या आहेत. त्यानंतर दुकानमालकाने ६० वर्षांपूर्वी जुनी एक खास पेन्सिलदेखील तरुणीला भेट म्हणून दिली.

शाका लाका बूम बूमची पेन्सिल आहे का तिथे (Viral Video)

व्हिडीओ शेअर करत तरुणी म्हणाली की, या दुकानात येणे आणि ता माणसाला भेटणे हे तिचे स्वप्न होते. बगदादच्या रस्त्यांवर फिरत असताना त्यांना हे दुकान नकळत सापडले. दुकानात पोहोचताच तिने दुकानमालकाला ‘तुम्ही आम्हाला सांगू शकाल का की येथे किती पेन्सिली आहेत’, असे मालकाला विचारले . त्यावर कोणताही विचार न करता अगदी लगेच ‘१० लाख’ असे उत्तर मालकाने दिले.

व्हिडीओ नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @monkey.inc या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरीसुद्धा हे अनोखे दुकान पाहून थक्क झाले आहेत आणि वेगवेगळे प्रश्न विचारताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. तसेच व्हिडीओखाली ‘शाका लाका बूम बूमची पेन्सिल आहे का तिथे’, ‘हे दुकान नक्की कुठे आहे’ आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.