Video Shows Women Quit IndiGo Air Hostess Job To Become Pilot : स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी नोकरी सोडणे फार कमी लोकांना जमते. पण, एका एअर होस्टेसने ही गोष्ट करून दाखवली आहे. तिने पायलट होण्यासाठी तिची एअर होस्टेसने नोकरी सोडली आहे. इंडिगोमध्ये एकेकाळी एअर होस्टेस असलेली खुशबू प्रधान हिने एअर होस्टेसपासून ते पायलटच्या सीटपर्यंत पोहचण्याचा तिचा प्रवासाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओच्या सुरुवातीला खुशबू एअर होस्टेसच्या युनिफॉर्ममध्ये दिसते आहे. मग त्यानंतर हळूहळू ती पायलटच्या युनिफॉर्ममध्ये दिसू लागते. पायलट होणे हे फक्त खुशबूचे नव्हे तर तिच्या कुटुंबातील सदस्यांचे सुद्धा स्वप्न होते आहे. त्यांनी खुशबूसाठी अनेक गोष्टींचा त्याग केला, स्वप्न मनात बाळगले आणि आशा सुद्धा ठेवल्या. तसेच पायलट होण्याच्या स्वप्नासाठी खुशबूने सुद्धा अनेक वर्ष वाट पहिली, कठोर परिश्रम घेतले, संयम, सातत्य आणि कुटुंबाकडून मिळालेल्या पाठिंब्याने तिला इथपर्यंत आणले आहे.

पायलट होण्यासाठी सोडली नोकरी (Viral Video)

पायलट प्रशिक्षणासाठी ते किती पैसे घेतात असा एका युजरने प्रश्न विचारताच खुशबू म्हणाली की, जर तुम्हाला इंडिगो कॅडेट पायलट बनायचे असेल तर तुम्ही १.३५ कोटी पैसे घेतात. यामध्ये तुमचे विमान भाडे, वैद्यकीय सेवा, परीक्षा शुल्क, अर्ज शुल्क, ग्राउंड स्कूल, तसेच ग्राउंड स्कूल दरम्यान आणि फ्लाइट दरम्यान तुमचा मुक्काम, वैद्यकीय विमा आणि इत्यादींचा समावेश असतो असे तिने उत्तर दिले. एअर होस्टेसपासून ते पायलट होण्याचा प्रवास एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @khusboo__pradhan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “या १८ वर्षांच्या मुलीला हे माहित नव्हतं की, एक दिवस पायलट होण्यासाठी ती नोकरी सोडेल” ; असा मजकूर आणि “मला माझे भविष्य कसे दिसेल हे माहित आहे कारण – मी त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मी खूप काही सहन केले आहे आणि तरीही प्रत्येक वेळी मी अधिक स्ट्रॉंग होऊन बाहेर निघाले ; अशी कॅप्शन तिने व्हिडीओला दिली आहे. नेटकरी सुद्धा हा व्हिडीओ पाहून तिचे भरभरून कौतुक करताना दिसत आहेत…