scorecardresearch

OMG! कित्येक फूट उंचावर क्रेनला लटकत राहिला कामगार आणि…, पाहा VIRAL VIDEO

या व्हिडीओमध्ये एक कामगार कित्येक फूट उंचावर एका क्रेनला लटकत राहिला. पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

Worker-Dangling-From-Crane
(Photo: Instagram/ my_s1)

इमारतीचे बांधकाम करणारे कामगार जीव धोक्यात घालून इमारतींची कामे करत असतात. कधी कधी एक छोटीशी चूक सुद्धा त्यांचा जीवघेणी ठरते. अशीच एक चूक एका कामगाराला खूपच महागात पडली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. या व्हिडीओमध्ये एक कामगार कित्येक फूट उंचावर एका क्रेनला लटकत राहिला. पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ टोरंटोमधला आहे. या शहरातल्या डाउनटाउनमधील एका बांधकाम साइटवर क्रेनला कित्येक फूट उंचावर हवेत एक कामगार लटकत राहिला. बुधवारी ही घटना घडली असून तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी या घटनेचे चित्रीकरण केले आणि तो व्हिडीओ पुढे सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ पाहताना प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर “ओह माय गॉड!” असे उद्गार आल्याशिवाय राहत नाही. हा धक्कादायक व्हिडीओ पाहून सारेज थक्क झाले आहेत.

आणखी वाचा : वीज तुमच्या गाडीवर कोसळली तर? काय होईल हे जाणून घेण्यासाठी हा VIRAL VIDEO पाहा

क्रेनच्या चालकाने या कामगाराला सुरक्षितपणे खाली उतरवलं. यात त्याला गंभीर दुखापत झाली नाही, असे सीबीसी न्यूजने म्हटले आहे. पण जो पर्यंत हा कामगार खाली जमिनीवर येत नाही तोपर्यंत सगळेच जण श्वास रोखून उभे होते. प्रकल्पाच्या प्रभारी बांधकाम कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, क्रेनला लोड जोडल्यानंतर कामगाराचा हात टॅगलाइनला अडकला होता, असं CBC ने दिलेल्या अहवालात म्हटलंय. या घटनेनंतर ओंटारियोच्या कामगार, इमिग्रेशन, प्रशिक्षण आणि कौशल्य विकास मंत्रालयाने साइटवर एक अन्वेषक पाठवला होता.

आणखी वाचा : म्हशीने आपल्या हटके स्टाईलने कासवाची केली मदत, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : हिंदू-मुस्लिम हे तर रक्ताचं नातं! VIRAL VIDEO पाहून तुम्हीही असंच म्हणाल…

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. ‘माय एस १’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ७१ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अडीच हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. काही लोकांनी यावर विनोद शेअर करण्यास सुरूवात केलीय तर काही लोकांनी या घटनेवरून पुढच्या वेळीस काळजी घेण्याचं आवाहन केलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video shows worker dangling from crane prp