Viral Video: हल्ली सोशल मीडियावर प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात कधी कोणी गाणं गाताना दिसतं, तर कधी कोणी अभिनय किंवा डान्स करताना दिसतं. त्यांपैकी काही व्हिडीओ खूप चर्चेतही येतात; ज्यांना लाखो व्ह्युज आणि लाइक्सही मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक मुलगा मराठी गाणं गाताना दिसतोय.

अलीकडे सोशल मीडियामुळे एखादं गाणं चर्चेत आलं की, त्या गाण्यावर लाखो रील्स बनवल्या जातात. त्यातील काही जण गाण्यांवर डान्स, अभिनय करताना दिसतात; तर काही जण स्वतः ते गाणं गाताना दिसतात. आताही असाच एक व्हिडीओ चर्चेत आलाय, ज्यात एक मुलगा सध्या खूप चर्चेत असलेलं ‘तुझी चाल तुरू तुरू’ हे गाणं गाताना दिसतोय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा त्याच्या लहान बहिणीला मांडीवर घेऊन बसला आणि त्यावेळी तो त्याच्या सुमधुर आवाजात ‘ तुझी चाल तुरू तुर’ , हे सध्या चर्चेत असलेलं गाणं गाताना दिसत आहे. त्याच्या गाण्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @shiiv2012 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत अनेक एक दशलक्ष व्ह्युज आणि एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकानं लिहिलंय, “भावी रील स्टार आहे भाऊ आपला…”. दुसऱ्यानं लिहिलंय, “खूप छान बाळा… आता फक्त योग्य स्टेज मिळावं बस्स”. आणखी एकानं लिहिलंय, “खूप मस्त… एकच नंबर”.