Viral Video : हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रति मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, आता अशाच एका गोड चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो खूप चर्चेत आला आहे.

डान्स, संगीत, अभिनय यांसारख्या कला क्षेत्रात आपलं नाव मोठं करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. सोशल मीडियावर लाखो युजर्स अशा विविध कला सादर करीत असतात, ज्यातील काही मोजकेच लोक लोकप्रिय होतात. या कला सादर करणाऱ्यांमध्ये अगदी लहानांपासून वृद्धापर्यंत प्रत्येक वयोगटातील लोकांचा समावेश असतो. सध्या सोशल मीडियावर एका डान्स स्पर्धेतील चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली ‘लंदन ठुमकदा’ या लोकप्रिय हिंदी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्सही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @adorable_aanyaa या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत सात दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “खूप सुंदर डान्स”. आणखी एकाने लिहिलेय, “मस्त”. आणखी एकाने लिहिलेय, “भन्नाट व्हिडीओ”.