Son Surprises His Father With Royal Enfield Bike : लेकराचा रस्ता ओलांडताना हात पकडून, वजन वाटली म्हणून बॅग खांद्याला लावून, पाय दुखायला लागलं की, कडेवर उचलून घेऊन, तर कधी पाठीवर बसवून बाबा प्रत्येक लेकराचा सांभाळ करीत असतो. त्यामुळे मोठं झाल्यावर त्यांना भल्यामोठ्या पगाराची; नाही तर आदर, सन्मान, नकळत त्यांची स्वप्नं लेकराकडून पूर्ण व्हावीत, अशी प्रत्येक वडिलांची इच्छा असते. तर आज बाबांची अशीच एक इच्छा व्हायरल व्हिडीओतील लेकराने पूर्ण केली आहे, ज्यामुळे बाबांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

आज लेकाने त्याच्या बाबांना रॉयल एनफिल्ड बाईक गिफ्ट केली आहे. लेक बाबांना शोरूममध्ये घेऊन जातो आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी बघण्यासारखा असतो. बाबा अगदी हसत-खेळत लेकराच्या खांद्यावर हात टाकत आहेत, तर बाईकची पहिली झलक पाहताच जोरजोरात शिट्या मारताना दिसत आहेत. तर एवढंच नाही, तर नवीन बाईकच्या आरशावर प्रेमाने हात फिरवताना दिसत आहेत. त्यानंतर बाबा बाईकवर बसतात आणि मग घराकडे वाट धरतात…

लेकराच्या कमाईची बाबांना बाईक… (Viral Video)

मुलांच्या शिक्षण आणि चांगली नोकरीसाठी बाबांनी दिवस-रात्र कष्ट घेतलेले असतात. लेकरानेसुद्धा या सगळ्या गोष्टी बरेच वर्ष पाहिलेल्या असतात. पण, याची परतडेफ करता येणे शक्य नसते. त्यामुळे बाबांनी बघितलेली स्वप्ने आपल्या परीने होईल तशी पूर्ण करण्याचे या मुलांचे स्वप्न असते. तर व्हायरल व्हिडीओतील लेकानेसुद्धा बाबांचे बाईक चालवण्याचे स्वप्न पूर्ण केले आणि त्यांना स्वतःच्या पैशांनी रॉयल एनफिल्ड बाईक घेऊन दिली आहे. तुम्हीसुद्धा एकदा नक्की बघा हा प्रेमळ व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @paulraj_.12 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये ‘लहानपणी मी त्यांच्या पाठीवर बसायचो आणि आता त्याला ही सुंदर गाडी चालवताना पाहणार आहे; खरंच, आयुष्य खूप बदललं आहेँ’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. @paulraj_.12 युजरच्या वडिलांची रिॲक्शन पाहून सगळेच भारावून गेले आहेत आणि “शेवटी, प्रत्येक बापाला स्वतःच्या पैशाची नाही, तर अशी लेकराच्या कमाईची बाईक मिळाली पाहिजे”, “त्यांचा उत्साह सगळं काही सांगून गेला” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत.