Student Funny Viral Video : शाळेतील सवंगडी, शाळेचा वर्ग, लाकडी बाक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून जाते. शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच. शाळेत अभ्यास, मित्र-मैत्रिणी यांच्या व्यतिरिक्त वाढदिवसही आनंदात साजरा व्हायचा. रोजच्या गणवेशातून एक दिवस सुट्टी मिळायची आणि नवनवीन, रंगीबेरंगी कपडे घालून जाण्याची परवानगी मिळायची. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये एका विद्यार्थ्याने वाढदिवसानिमित्त केलेली एक मजेशीर गोष्ट शिक्षकांनाही पोट धरून हसायला भाग पाडली आहे.

तुम्हाला आठवत असेल की, शाळेत वाढदिवस असताना नवीन कपडे घालून संपूर्ण वर्गासमोर उभे केले जायचे. मग वर्गातील सगळे विद्यार्थी एकत्र येऊन वाढदिवसाचे गाणे गायचे. एवढेच नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याला चॉकलेट सुद्धा वाटले जायचे. पण, आज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत काहीतरी वेगळंच पाहायला मिळाले आहे. एका विद्यार्थ्याचा वाढदिवस असतो; यादरम्यान तो शिक्षकांकडे एक पिशवी घेऊन जातो. तर या पिशवीत चॉकलेट किंवा आणखीन काही नसून चक्क साखर असते.

सर पण झाले शॉक (Viral Video)

विद्यार्थ्याच्या मनात काय आले असेल ठाऊक नाही. पण, चॉकलेटऐवजी साखर वाटण्याची भन्नाट कल्पना पाहून शिक्षकाने सुद्धा डोक्याला हात मारला आणि पोट धरून हसू लागले. विद्यार्थी साखर आणि एक चमचा घेऊन तो शिक्षकांजवळ गेला. तेव्हा शिक्षकाने त्यांना साखर विद्यार्थ्यांमध्ये वाटण्यास सांगितले. त्यानंतर वर्गात उपस्थित सगळेच विद्यार्थी या भन्नाट आणि अनोख्या कल्पेनेने जोरजोरात हसायला लागले आणि इथेच व्हिडीओचा अगदी मजेशीर शेवट झाला. एकदा बघाच हा व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @get_set_viral आणि @aaj_kay_navin1010 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “पठ्ठ्यानं वाढदिवसानिमित्त वर्गात चॉकलेट ऐवजी वाटली साखर, सर पण झाले शॉक” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ बघून “भाऊचा साखर कारखाना आहे वाटतं”, “तुझ्याकडे पार्टी सुद्धा मागायला नको”, साखरेऐवजी गूळ वाटला असतास तरीही चालले असते”, “चॉकलेट पण साखरेचेच बनलेले असतात. तसेही यात काय वाईट आहे भाऊने तर उलट केमिकल युक्त साखर वाटली आहे” ; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून येत आहेत.