सोशल मीडियाच्या जगात रोज अनेक व्हिडीओ, फोटो, पोस्ट व्हायरल होत असतात. काही पोस्ट विचार करायला लावतात तर काही हसवतात. सोशल मीडिया हे असं माध्यम आहे ज्यामुळे अनेकांना आपली कला सादर करायची, अनेक लोकांकडे एकाच वेळी पोहचवायची संधी देत. कलाकारांचे आपली कला दाखवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ काल पासून तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये युवा कलाकार श्री स्वामी समर्थांचे भित्तिचित्र रेखाटत आहे.
कुठला आहे हा व्हिडीओ?
हा व्हिडीओ अक्कालकोट मधला आहे.अक्कलकोट तालुक्यात नव्याने सुरु होत असलेल्या हॉटेलजवळ स्वामी समर्थांचे सर्वात मोठे भित्तिचित्र साकारण्यात आले आहे. हे भित्तिचित्र पुण्यातील चित्रकार निलेश खराडे यांनी साकारलं आहे.
(हे ही वाचा: शिकार करण्यासाठी चित्त्याने घेतली हरणावर झेप पण…; बघा Viral Video)
चित्र रेखाटतनाचा व्हिडीओ पोस्ट करत निलेश कॅप्शन लिहतो की, “श्री अक्कलकोट स्वामी समर्थ या तीर्थक्षेत्री अनेक वर्षापासुनची स्वामींची भित्तिचित्र साकारन्याची इच्छा आज गुरुवार रोज़ी पूर्णत्वास येत आहे. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोल राजे भोसले यांच्या संकल्पनेतुन अक्कलकोट तालुक्यात स्वामीभक्तांसाठी नव्याने सुरु होत अजिंक्यतारा हॉटेल येथे संपूर्ण सोलापुर जिल्यातील श्री स्वामी समर्थ महाराजांचे सर्वात मोठे भित्तिचित्र साकारत आहे. तरी मी त्यांच्या या कलेबद्दलच्या आदराबद्दल खुप आभारी आहे.”
(हे ही वाचा: Pune Metro: पुणेरी आजोबांनंतर आता मेट्रोमधील आईचा मजेशीर Video Viral)
(हे ही वाचा: सिंहांच्या कळपाने केली एका जिराफाची शिकार! अंगावर काटा आणणारा Video Viral)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ मूळतः इंस्टाग्रमवर पोस्ट करण्यात आला होता. परंतु आता हा व्हिडीओ सगळ्याच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून कालकाराचं खूप कौतुक करत आहेत. अनेक हजार लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे.