Viral Video: दिवाळीत अनेक जण मोठमोठे फटाके फोडून स्वतःबरोबरच इतरांसाठीही प्रदूषणासह संकटाला आमंत्रण देतात. दिवाळी संपली असली तरीही अजूनही लोकांमधील दिवाळीचा उत्साह कमी झालेला नाही. खरं तर फटाक्यांमुळे वायू आणि ध्वनिप्रदूषण होते; पण तरीही अनेक जण आनंद साजरा करण्यासाठी फटाके वाजवतातच. त्याशिवाय फटाके वाजविताना जीवघेणे स्टंटदेखील करतात, ज्यात बऱ्याचदा काहींना गंभीर दुखापत होते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी रॉकेट पेटवत असून यावेळी अचानक असं काहीतरी होतं, जे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

खरं तर फटाके फोडताना घरातील लहान मुलं, गर्भवती महिला, वयोवृद्ध किंवा आजारी व्यक्ती आणि पाळीव प्राण्यांची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक श्वान पेटत्या रॉकेटबरोबर असं काहीतरी करतो, जे पाहून नेटकरी अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी रॉकेट पेटवत असून रॉकेट पेटवल्यानंतर ती बाजूला होते. त्यावेळी अचानक श्वान तिथे येतो आणि स्वतःच्या तोंडात पेटवलेले रॉकेट पकडून तो पळू लागतो. श्वानाने तोंडात पकडलेले रॉकेट पाहून सगळे लोक इकडे तिकडे पळू लागतात. पुढे जाऊन चटका बसल्यामुळे श्वान तोंडातील रॉकेट खाली फेकून पळून जातो.

हेही वाचा: ‘त्याने मृत्यू जवळून पाहिला…’ पिंजऱ्यात गेलेल्या तरुणावर सिंहाने केला हल्ला; VIDEO पाहून फुटेल घाम

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @rashmi_pal__chhori_gadariya_ki या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत त्यावर जवळपास ४० मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि सात लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “मूर्ख लोक आहेत.” आणखी एका युजरनं लिहिलंय, “प्राण्यांची काळजी घ्यायला हवी.” आणखी एकानं लिहिलंय, “त्यांना काही कळत नाही, पण तुम्हालाही कळत नाही का?” तर अनेक जण यावर तीव्र संताप व्यक्त करताना दिसत आहेत.