Viral Video: श्वान हा अनेकांचा आवडता आणि खूप लाडका प्राणी आहे. शिवाय श्वानाच्या प्रामाणिकपणामुळे त्याच्यावर सर्वांचा विश्वास असतो. श्वानाला अनेक घरांमध्ये घरातील इतर सदस्यांसारखीच उत्तम वागणूक दिली जाते. त्याची आवड-निवड पूर्ण केली जाते. अनेक जण श्वानाचे वाढदिवसदेखील आवडीने साजरे करताना दिसतात. अशा अनेक कौतुक सोहळ्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. आता असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात श्वान एका चिमुकल्याबरोबर असं काहीतरी करतोय जे पाहून अनेक जण त्याचं कौतुक करताना दिसत आहेत.

लहान मुलं आणि त्यांच्या घरातील पाळीव प्राणी यांच्यात नेहमीच अनोखं नातं पाहायला मिळतं. ही लहान मुलं नेहमीच प्राण्यांची काळजी घेताना दिसतात. मागील काही दिवसांपूर्वीही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात एक लहान मुलगी घरातील पाळीव श्वानाबरोबर खेळ खेळताना दिसत होती. पण, आता असा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक श्वान लहान मुलाची काळजी घेताना दिसत आहे. श्वान आणि मुलामधील हे बॉण्डिंग पाहून नेटकरीही कौतुक करत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, समुद्रकिनाऱ्यावर एक चिमुकला श्वानाबरोबर खेळत असून दूरवर त्याचे वडील फुटबॉल खेळताना दिसत आहेत. यावेळी तो चिमुकला पुढे चालत जाण्याचा प्रयत्न करतो, पण तो पडणार असल्याचे लक्षात येताच श्वान त्याला पटकन आधार देतो. त्यानंतर तो चिमुकला पुन्हा चालत जाण्याचा प्रयत्न करतो. पण, चालता चालता पडू नये म्हणून श्वान त्याच्या बाजूला उभा राहून त्याला आधार देतो. चिमुकला आणि श्वानाचं हे क्युट बॉण्डिंग पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील एका @shetkari_brand_rg या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत जवळपास हजारो व्ह्यूज आणि काही लाइक्स मिळाल्या आहेत.

हेही वाचा: ‘जेव्हा मृत्यूची चाहूल लागते…’ लांडगा अचानक घाबरला आणि पळू लागला; पुढे त्याच्याबरोबर जे घडलं… VIDEO पाहून नेटकरीही हळहळले

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय, “खूप छान नातं आहे यांचं”, तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “श्वान खूप चांगले असतात.” तर तिसऱ्याने लिहिलेय, “आमचा शेरूपण असाच आहे.” तर इतर युजर्स श्वानाच्या प्रमाणिकपणाचे कौतुक करताना दिसत आहेत.