Viral Video: समाजमाध्यमांवर व्हायरल होणारे प्राण्यांचे व्हिडीओ बऱ्याचदा आपलं लक्ष वेधून घेतात, ज्यामुळे प्राण्यांबद्दलच्या अनेक गोष्टी आपल्यालाही कळतात. यातील काही व्हिडीओंमध्ये प्राणी शिकार करताना दिसतात, तर काही व्हिडीओंमध्ये प्राणी एकमेकांबरोबर खेळताना दिसतात. दरम्यान, आता असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर नकळत हसू येईल.

आई नेहमी तिच्या मुलांना चांगले संस्कार लागावे म्हणून योग्य काळजी घेते. आई तिच्या मुलांवर जेवढे प्रेम करते, तेवढीच ती प्रसंगी त्यांच्यावर रागावते, ओरडते आणि वेळ पडल्यास त्यांना चोपही देते. आई आणि तिच्या मुलांमधील हे खास नाते खूप अनमोल आहे. आई आणि मुलांच्या प्रेमाचे असे अनेक गोड क्षण सोशल मीडियामुळे आपल्याला सतत पाहायला मिळत असतात. मग ते मनुष्य असो किंवा प्राणी, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येही असंच काही पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका जंगलातील रस्त्यावरून हत्ती आणि हत्तीचे पिल्लू फिरत असून यावेळी जंगलात आलेले काही पर्यटक हत्तीच्या पिल्लाला स्वतःकडे बोलावतात, त्यामुळे ते पिल्लू त्याच्या आईला सोडून पर्यटकांकडे जाण्याचा प्रयत्न करते. परंतु, त्याची आई त्याला आपल्या सोंडेने अडवते आणि स्वतःबरोबर घेऊन जाते. ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलांना अनोळखी व्यक्ती पाहून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते, त्याचप्रमाणे हत्तीदेखील आपल्या बाळाला अनोळखी लोकांपासून दूर ठेवताना दिसत आहे.

हेही वाचा: ‘जेव्हा पोटातली भूक मर्यादा ओलांडते…’ त्यांनी खरकटं अन्न गोळा करून असं काही केलं… VIDEO पाहून व्हाल भावूक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @rabianimah या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर अनेक व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर विविध कमेंट्सही करताना दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “शेवटी आईच ती, मुलांना योग्य मार्ग दाखवणारच”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “खूप सुंदर व्हिडीओ”, तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “निसर्गाने आईच्या हृदयात मुलांबद्दल खूप प्रेम दिलं आहे.”