Viral Video: समाजमाध्यमांवर अनेकदा विविध व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. ज्यातील काही व्हिडीओ आपला थरकाप उडवतात, तर काही व्हिडीओंमुळे आपले मनोरंजन होते. सोशल मीडियावर बऱ्याचदा लग्नातील विविध व्हिडीओदेखील व्हायरल झालेले पाहायला मिळतात; ज्यात लग्नातील किस्से, प्रथा, भांडणं सर्व काही असते. मागील काही दिवसांपूर्वी विविध लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. दरम्यान, आतादेखील एका लग्नातील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीदेखील अवाक व्हाल.

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून नुकत्याच काही दिवसांपूर्वी जुलै महिन्याला सुरुवातदेखील झाली. त्यामुळे आता बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊसही पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, पूर येणे अशा नैसर्गिक समस्या उद्भवू लागल्या आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येदेखील असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून तुम्ही कपाळावर हात मारुन घ्याल.

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये? (Viral Video)

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नसमारंभातील असून यामध्ये तुम्ही पाहू शकता, लग्नाच्या संपूर्ण मंडपात गुडघ्याएवढे पाणी साचलेले आहे. तरीही अनेक मंडळी लग्नातल्या जेवणासाठी जात असल्याचे दिसत आहे. यातील काही लोक हे पाणी ओलांडताना दिसत आहेत, तर काही लोक नवीन कपडे घालून मंडपात जाताना दिसत आहेत. या व्हिडीओतील व्यक्तींना पाहून हे लोक आतमध्ये लग्नाच्या जेवणाची मेजवानी खाण्यासाठी गेल्याचे दिसत आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ X(ट्विटर) वरील @छपरा जिला या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत, तसेच अनेक जण या व्हिडीओवर कमेंट करतानादेखील दिसत आहेत.

हेही वाचा: Viral Video: भररस्त्यात दोन गायी भिडल्या पण श्वानाने केलं असं काही… पाहून नेटकरी म्हणाले,”याला एक पुरस्कार द्या…”

पाहा व्हिडीओ (See Video)

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत (Viral Video Comments)

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “मेजवानी जिंदाबाद, लिफाफा मिळाला की नाही”, दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “मेजवानी टाकून देण्यापेक्षा सर्वकाही खाल्लेले चांगले.” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिलंय की, “आधी जेवण, बाकी सर्व नंतर”; तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “जर अन्न खाल्ले नाही तर ते वाया जाईल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यापूर्वीदेखील लग्नातील विविध व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. यातील एका व्हिडीओमध्ये काही तरुण मित्राच्या लग्नात सुंदर डान्स करताना दिसले होते, तर आणखी एका व्हिडीओमध्ये एक नवरी नवऱ्याला मारताना दिसली होती.