Viral Video: सोशल मीडियावर जंगलातील प्राण्यांचे नवनवीन व्हिडीओ सातत्याने व्हायरल होत असतात. जंगलातील व्हायरल व्हिडीओ पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. त्यात कधी एखादा हिंस्र प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करताना दिसतो; तर कधी कधी प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ क्षणार्धात व्हायरल होऊन लाइक्स मिळवतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक तरस सिंहाला मुद्दाम डिवचताना दिसत आहे.

तरस जंगलातील असा प्राणी आहे, जो बऱ्याचदा समूहामध्ये राहतो आणि शिकारीही समूहानेच करतो. सिंह, बिबट्या, वाघ यांसारखे हिंस्र प्राणीदेखील तरस प्राण्याला खूप घाबरतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे. पण, यात एक तरस प्राणी निवांत झोपलेल्या सिंहाला त्रास देताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका जंगलातील गवताळ प्रदेशामध्ये सिंह निवांत झोपला असून, तिथे एक तरस प्राणी येतो आणि मुद्दाम सिंहाची शेपूट ओढून पळून जातो. यावेळी निवांत झोपलेला सिंह पटकन जागा होतो आणि आजबाजूला पाहून पुन्हा निवांत झोपतो. हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: पुणे तिथे काय उणे! पुण्यातील मॉलमध्ये श्वानाचा खेळ; VIDEO पाहून येईल हसू

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Akhil (@insane_akhil)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हायरल व्हिडीओ यूट्यूबवरील @insane_akhil या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत पाच लाखांहून अधिक व्ह्युज आणि १५ हजारांहून लाखांहून लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय, “प्राणीपण एकमेकांची खोड काढतात.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “हा प्राणी इतर प्राण्यांसाठी खूप त्रासदायक आहे.” तिसऱ्याने लिहिलेय, “सिंहाची मस्करी करणं सोपी गोष्ट नाही.”