Viral Video: समाजमाध्यमांवर नेहमीच विविध व्हिडीओ, फोटो व्हायरल झाल्याचे आपण पाहतो. त्यात कधी कोण डान्स करताना, अभिनय करताना तर कोण गाणी म्हणताना दिसते. अनेकांना आपली कला सादर करण्यासाठी सोशल मीडिया हा खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. बऱ्याचदा सोशल मीडियावर आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडील अनेक गोष्टीदेखील व्हायरल झालेल्या पाहायला मिळतात. त्यात कधी काही लोक, कधी काही प्राणी असं काहीतरी करताना दिसतात, जे पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटते. सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यात चक्क एक सिंह एका व्यक्तीसह कारमध्ये बसून प्रवास करताना दिसत आहे.

अनेकांना वाघ, सिंह, बिबट्या म्हटलं तरी घाम फुटतो. जंगलातील प्राणीदेखील या हिंस्र प्राण्यांपासून सतत आपला जीव वाचविण्याच्या प्रयत्नात असतात. पण, आता एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक व्यक्ती कारमध्ये त्याच्याबरोबर सिंहाला घेऊन प्रवास करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

हा व्हायरल व्हिडीओ परदेशातील असून, या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीची कार सिग्नलसाठी थांबली असताना त्याला समोरच्या कारमध्ये एक सिंह बसलेला दिसतो. यावेळी तो सिंह खिडकीतून अर्धा बाहेर आला होता. या व्यक्तीची कार सिंह बसलेल्या कारच्या पुढे जाते तेव्हा सिंह आळस देताना दिसतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करीत त्या व्यक्तीने लिहिले, “मी माझ्या मांजरीसह फिरायला जात आहे; तर कारमधील व्यक्ती सिंहासह जात आहे.”

हा व्हिडीओ X (ट्विटर)वरील @The Best या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास ३० हजारांहून अधिक व्ह्युज आणि आतापर्यंत अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक जण या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘जोडी असावी तर अशी…’ कोरियन नवरा अन् भारतीय नवरी; लग्नाचा VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

या व्हिडीओवर एकाने लिहिलेय, “अरे व्वा…” दुसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “बापरे, याला बघून खूप भीती वाटली.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “मांजर मात्र खूप गोंडस दिसत आहे; पण सिंह राजा आहे.” चौथ्या युजरने लिहिलेय, “तर आणखी एकाने लिहिलेय, “पुढे काय घडलं?”