Viral Video: “तू फक्त साथ दे, अख्खं आयुष्य सुंदर बनवू”, असं म्हणणारा जोडीदार प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात हवा असतो. खरंच प्रेम ही एक खूप सुंदर आणि निर्मळ भावना आहे. आपल्या आधीच्या पिढीसाठी प्रेम केवळ अपेक्षा पूर्ण करणं नसून एकमेकांच्या सुख-दुःखांत एकमेकांना साथ देणं, परिस्थिती समजून घेणं, कधीतरी आपल्या जोडीदारला एखादी गोष्ट आवडते म्हणून त्याच्यासाठी ती आवडीनं करणं, याला खरं प्रेम म्हणतात. पण, हल्लीचा बदलणारा काळ बघता, प्रेम, लग्नं फार काळ टिकत नाहीत आणि त्यामुळे ते दोघं एकमेकांना आयुष्यात कितपत साथ देतील हे सांगता येत नाही. दरम्यान, आता एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात एक आजी-आजोबा आयुष्यातील सुंदर क्षण जगताना दिसत आहेत.

आजी-आजोबांचं अतूट प्रेम

हेही वाचा: “अरे बापरे…”, रक्षाबंधनाच्या दिवशी माकडाला भाऊ मानून केलेली मस्ती आली अंगलट; VIDEO पाहून बसेल धक्का

अनेकदा सोशल मीडियावर वृद्ध जोडप्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात; ज्यामध्ये त्यांचे प्रेम पाहून आपल्यालाही हेवा वाटतो. या व्हायरल व्हिडीओमध्येदेखील असंच प्रेम पाहायला मिळतंय, जे पाहून अनेक जण व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक वृद्ध जोडपं एकमेकांचा हात हातात घेऊन जिना चढण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावेळी दोघांनी एकमेकांचा हात घट्ट पकडला असून दोघेही एकमेकांना सावरत जिना चढत आहेत. दोघांमधील हे प्रेम पाहून सोशल मीडियावर अनेक लोक कमेंट्स करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @rajdhani_satara03 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर ११ हजारांहून अधिक व्ह्युज आणि लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘युक्तीचा अनोखा खेळ…’ श्वानाची शिकार करण्यासाठी वाघाने लढवली शक्कल… VIDEO पाहून युजर्सही झाले शॉक

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यापूर्वीहीदेखील अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते; ज्यात एक आजोबा आपल्या पत्नीचा फोटो काढताना दिसले होते. तर, आणखी एका व्हिडीओत आजी-आजोबा एकमेकांशी भांडण करताना दिसले होते.