Viral Video: वाघ हा जंगलातील सर्वात खतरनाक शिकारी म्हणून ओळखला जातो. कारण एकदा का वाघानं पकडलं की मग तो सिंह असला तरी त्याला तो सोडत नाही. त्यामुळे मोठमोठे प्राणी देखील वाघापासून दूर राहतात. कारण वाघाचा वेग आणि हल्ला करण्याची क्षमता जबरदस्त असते. शक्तीबरोबरच अनेकदा वाघ शिकार करण्यासाठी युक्तीचा वापर करतानाही दिसून येतो. सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये असंच एक थरारक दृश्य पाहायला मिळत आहे.

समाजमाध्यमांवर सतत प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात; ज्यात अनेकदा प्राण्यांचे मजेशीर, तर कधी थरारक व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ काही क्षणांत लाखो व्ह्युज मिळवतात. त्यातील काही व्हिडीओ पाहून आपल्या अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ पाहायला मिळत आहे; ज्यात एक वाघ कुत्र्याची शिकार करण्यासाठी डावपेच आखताना दिसतोय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका जंगलामध्ये शिकारीच्या शोधात असणाऱ्या वाघाला एक कुत्रा दिसतो. यावेळी वाघ सरळ कुत्र्यावर झडप घालू शकला असता पण तो असं न करता दपक्या पावलांनी कुत्र्याजवळ येताना दिसतोय. यावेळी बिचारा कुत्रा मात्र बेसावध आहे. पुढे वाघ कुत्र्याची शिकार करतो की नाही हे या व्हिडीओत दिसत नाही. परंतु वाघाच्या युक्ती आणि शक्तीचा अंदाज घेता. कुत्र्याची शिकार झाली असावी असा अनेक नेटकरी अंदाज लावत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ युट्यूबवरील @abn3looby94 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत अनेक व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. . एकाने लिहिलंय की, “नक्कीच वाघाने कुत्र्याला खाल्लं”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “वाघ खूप चतुर आहे. ”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “पुढे काय झालं असेल?”