Viral Video: विषारी नागाचा फोटो जरी आपल्या डोळ्यासमोर आला तरी आपली घाबरगुंडी उडते. साप, नाग, अजगर या सर्व जातींना अनेक जण घाबरतात, यात काही नवल नाही. अनेकदा सोशल मीडियावर यांचे अनेक व्हिडीओ, फोटोदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. नुकत्याच एक-दोन दिवसांपूर्वी परदेशातील एका अजगराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात तो अजगर एका गाडीच्या मागच्या बाजूला अडकलेला दिसत होता. या व्हिडीओनंतर आता एक धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात दोन विषारी नाग एकमेकांबरोबर भांडण करताना दिसत आहेत.

सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे ज्यावर रातोरात एखादी गोष्ट प्रचंड व्हायरल होते आणि हे अपलोड करणाऱ्याला तितकीच प्रसिद्धीही मिळते. असाच आणखी एक व्हिडीओ काही दिवसांपासून यूट्यूबवर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात दोन विषारी नाग एकमेकांबरोबर भांडण करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जंगलामध्ये दोन नाग एकमेकांबरोबर भांडण करत असून यावेळी ते एकमेकांवर खुन्नस काढताना दिसत आहेत. नागांचा हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. हा व्हिडीओ इन्स्टाग्रावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @MalaMalaGameReserve या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला आतापर्यंत अनेक व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं लिहिलंय, “पुढे या दोघात कोण जिंकलं?”, तर आणखी एकानं लिहिलंय, “बापरे, बघून घाबरलो”, तर आणखी एकानं लिहिलंय, “हे पाहून माझ्या अंगावर काटा आला.”