Unhygienic vegetables video : सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत, असं म्हणत आपण आहारात सर्व भाज्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करीत असतो. आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा विचार करीत असलो तरी त्याची दुसरी बाजू गंभीर आहे. कारण- भाजी मंडईभोवती अस्वच्छता वाढली आहे. त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या पालेभाज्या आरोग्यासाठी अपायकारक ठरत असून, ग्राहक भाजी घेतात की आजार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. इथपर्यंत ठीक होतं; मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून भाज्या थेट आता शेतातूनच आणायच्या का, असा सवाल उपस्थित होतोय. कारण- आता विक्रेते बाजारात प्रचंड केमीकल मारलेल्या भाज्या विकत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये गृहिणीने फ्लॉवरची भाजी विकत आणली होती, ही भाजी बनवण्यााधी तिनं पाण्यात टाकली मात्र त्यानंतर जे झालं ते पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भाजा घेताना १०० वेळा विचार कराल हे नक्की…

बाजारात जेव्हा कधी आपण पालेभाज्या विकत घेण्यासाठी जातो तेव्हा त्या अगदी हिरव्यागार आणि ताज्या असाव्यात हे आपण कटाक्षाने निरखून पाहत असतो. पण बाजारातून आपल्या ताटापर्यंत येणाऱ्या या पालेभाज्या नेमक्या कशा पिकवण्यात आल्या आहेत किंवा कुठून आल्या आहेत याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? नसेल तर सध्या व्हायरल झालेला एक व्हिडीओ पाहून तु्म्ही भाजी घेताना १०० वेळा विचार कराल. हा व्हिडीओ पाहून हे पाहिल्यानंतर तुमचेही डोळे विस्फारतील.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका महिलेनं बाजारातून फ्लॉवरची भाजी आणली होती. आपण सगळेच बाजारातून काहीही आणलं तरी आधी स्वच्छ धुवून घेतो. तसंच या महिलेनंही फ्लॉवरची भाजी पाण्यात टाकली, मात्र काही वेळातच या फ्लॉवरच्या भाजीचा रंग जांभळा होऊ लागला. म्हणजेच इतक्या मोठ्या प्रमाणा केमीकल या फ्लॉवरच्या भाजीवर मारण्यात आलं होतं. तसेच या पाण्यावर तेलाचा थर तरंगत होता. अशाप्रकारे जर ही भाजी आपल्या पोटात गेली तर त्याचे आरोग्यावर काय परिणाम होतील हे वेगळं सांगायची गरज नाही. बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाह. कारण- आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Bobby Soodan (@baltej_1417)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा प्रकार पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. “लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे,” “जगायचं की नाही” अशा प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. बाजारात आधीच भेसळयुक्त खाद्यपदार्थांमुळे ग्राहक फसवले जात आहेत. तेल, मसाले, दूध यांसारख्या मूलभूत वस्तूंमध्ये भेसळ ही नित्याचीच बाब बनली आहे. मात्र, आता थेट भाज्यांमध्येही भेसळ होत असल्याचं उघड झाल्यानं खवय्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.