Crocodile Who Loved Rice: माणसाचा किंवा भल्या मोठ्या प्राण्यांचा अक्षरशः फडशा पाडून खाऊ शकेल इतकी शक्ती मगरीत असते. पण तुम्ही कधी साधी भोळी मंदिरात राहणारी मगर पाहिली आहे का? जर नसेल तर आज तुम्ही काहीतरी अनोखं व नवीन जाणून घेणार आहात. केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील अनंतपुरा नावाच्या गावातील मंदिराच्या संकुलात भाविकांसाठी मगरीला पाहणे हे प्रमुख आकर्षण होते. मुळात मगर पाहणे हेच थरारक असताना वर ही मगरही काही साधी सुधी नव्हती बरं का? केरळच्या या मंदिरातील मगर चक्क भात खाणारी शाकाहारी मगर होती. बाबिया असे तिचे नाव असून ती ७५ वर्षांची होती.
अनंतपुरा गावात तलावाच्या मध्यभागी श्री अनंतपुरा मंदिर आहे. केरळमधील हे एकमेव तलाव मंदिर आहे आणि अनंतपद्मनाभ स्वामी (पद्मनाभस्वामी मंदिर) तिरुवनंतपुरमचे मूळ स्थान (मूलस्थानम) असल्याचे मानले जाते. याच मंदिराच्या आवारात बाबिया राहत होती. काही दिवसांपूर्वी कासारगोड येथील श्री आनंदपद्मनाभ स्वामी मंदिरात तिचे निधन झाले. भक्तांचा असा विश्वास होता की बाबिया मगर मंदिराच्या रक्षणासाठी देवाने नियुक्त केलेली होती.
वर्षानुवर्षे, मंदिरातील भक्तांनी बाबियाला भगवान पद्मनाभनचे संदेशवाहक मानले होते. मंदिराच्या आवारातील बाबियाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायचे.बाबिया ही मगर मंदिराच्या तळ्यात कशी आली? तिचे नाव कोणी ठेवले? हे कोणालाच माहीत नव्हतं. असे मानले जाते की ७० वर्षांहून अधिक काळ हि मगर मंदिराच्या तलावात राहत होती आणि कधीच तिने जंगली प्राण्याची वर्तणूक केली नव्हती.
दरम्यान, मंदिराचे पुजारी बाबियाला दिवसातून दोनदा भाताचा गोळा खाऊ घालायचे. पुजार्याची बाबियासह एक अनोखी केमिस्ट्री असते. मंदिराच्या तलावात पुरेसे मासे असूनही बाबियाने कधीच त्यांच्यावर हल्ला केला नाही किंवा खाल्ले नाही. पुरातन मंदिराच्या इतिहासात पूर्णपणे शाकाहारी मगर म्हणून बाबिया ओळखली जात होती.
भात खाणारी मगर
Video: कुत्रा नाही डॉन म्हणा! एवढ्याशा कुत्र्याने थेट वाघाचा कान चावला, सिंहाने मध्यस्थी करताच…
वन्यजीव तज्ज्ञांच्या माहितीनुसार बाबिया ही मुग्गर प्रजातीची मगर होती. मंदिरातील प्रसाद तिच्यासाठी पूरक आहारासारखा होता. सहसा जंगलात मगरी मासे, उंदीर आणि सरपटणारे प्राणी यांची शिकार करतात हरीण, रानडुक्कर इत्यादी लहान आणि मोठ्या सस्तन प्राण्यांना देखील खातात पण सवयीमुळे बाबियाला शाकाहारी जेवणाची आवड होती.